प्रत्येकाने झाडे लावून ती जोपासावीत
By admin | Published: July 6, 2017 02:34 AM2017-07-06T02:34:56+5:302017-07-06T02:34:56+5:30
आपल्याला आयुष्यभर जगण्यासाठी आवश्यक असलेला अॉक्सिजन निसर्गात स्वत: निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने झाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रांजणगाव गणपती : आपल्याला आयुष्यभर जगण्यासाठी आवश्यक असलेला अॉक्सिजन निसर्गात स्वत: निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून ती जोपासली पाहिजेत, असे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केले.
निमगाव म्हाळुंगी येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘एकच लक्ष्य चार कोटी वृक्ष’ उपक्रमांतर्गत विद्या विकास मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी फियाट कंपनीचे व्हाईस पे्रसिडेंट राकेश बावेजा, शिरूर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, जि.प.
सदस्या रेखाताई बांदल, गटविकास अधिकारी संदीप जठार, गटशिक्षणाधिकारी अर्जुन मिसाळ, संस्थेचे सचिव रामचंद्र काळे, पं.स. सदस्य विजय रणसिंग, विक्रम पाचुंदकर, दौलत शितोळे, सरपंच चागुंणा काळे, उपसरपंच महेंद्र रणसिंग, प्राचार्य दिलीप
पवार, किरण काळे, दादासाहेब रणसिंग, आबासाहेब शितोळे,
कानिफ गव्हाणे, तेजस यादव तसेच ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी बांदल, उमाप, बावेजा यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. संजीव मांढरे यांनी सूत्रसंचालन केले. किरण काळे यांनी प्रास्तविक केले. प्राचार्य दिलीप पवार यांनी आभार मानले.
दुप्पट झाडे लावण्याचा संकल्प
देसाई म्हणाले, की शासनाने पुणे जिल्हा परिषदेला दिलेल्या उद्दिष्टाच्या दुप्पट झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. तो ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे.
या वेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध वेषभूषा करून गावातून हातात फलक घेऊन टाळमृदंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढली होती. शालेय परिसरात विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.