सगळ्यांच्या नजरा अवाक् होतात...जेव्हा माजी‘मिस वर्ल्ड’ येते साक्ष नोंदविण्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 06:24 PM2018-10-27T18:24:41+5:302018-10-27T18:49:11+5:30

जे आम्ही पाहिलेच नाही, ते साक्षीत कसे नोंदवणार? त्या गोष्टीला खूप महिने झाले आहेत. तरी देखील दावा दाखल करण्यात आला नव्हता.

Everyone's eyes shocking... when the former'Miss World' comes in to record the testimony | सगळ्यांच्या नजरा अवाक् होतात...जेव्हा माजी‘मिस वर्ल्ड’ येते साक्ष नोंदविण्यासाठी

सगळ्यांच्या नजरा अवाक् होतात...जेव्हा माजी‘मिस वर्ल्ड’ येते साक्ष नोंदविण्यासाठी

Next
ठळक मुद्देवृक्षतोडीच्या विरोधात माजी मिस वर्ल्डचा लढा, कल्याणीनगर येथील घटना  गेल्या अनेक महिन्यांपासून दावा दाखल करून घेण्यासाठी होत होता विलंब सात महिन्यांनंतर संबंधित वृक्षतोड करणाऱ्यांवर दावा दाखल

पुणे : महापालिकेच्या न्यायालयात शुक्रवारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरु होते. परंतु, तिचे परिसरात परिसरात आगमन झाले आणि वातावरण एकदमच बदलून गेले. परंतु, ती मनात निर्धार घेवून आली होती. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तिने कार्यकर्त्यांसोबत लढा देण्याचा ठाम निश्चय केला होता. काही महिन्यांपूर्वी कल्याणीनगर येथे सुमारे ५९२ वृक्ष तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.. हो..हो....त्याचप्रकरणी संबंधितांविरोधात महापालिकेच्या न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी साक्ष नोंदविण्यास माजी मिस वर्ल्ड युक्ता मुखी यांनी हजेरी लावली होती.
सात महिन्यांनंतर संबंधित वृक्षतोड करणाऱ्यांवर दावा दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अ‍ॅड. शिवाजीराव पाटील यांनी दिली. लवकर पुढील कार्यवाही होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
कल्याणीनगर येथे सुमारे ५९२ वृक्ष तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्याबाबत नगर रोड क्षेत्रीय कार्यालय अधिकारी सुनील गायकवाड यांनी संबंधितांना नोटिसा दिल्या होत्या. संबंधितांना नोटीस दिल्यानंतर त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्यानंतर महापालिका न्यायालयात आज दावा दाखल करून घेण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून हा दावा दाखल होत नव्हता. 
पाटील म्हणाले,‘‘वृक्षतोड प्रकरणी पंचनामा करण्यात आला असून, महापालिकेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पर्यावरणप्रेमींनी देखील याबाबत सांगितले आहे. त्यानूसार आम्ही आज न्यायालयात दावा दाखल केला. या संदर्भातील पर्यावरणप्रेमी साक्षीदार म्हणून शुक्रवारी न्यायालयात आले होते. ’’  
पर्यावरणप्रेमी धर्मराज पाटील म्हणाले,‘‘आम्ही न्यायालयात साक्ष देण्यासाठी आलो होतो. परंतु, आमची साक्ष महापालिकेच्या वकिलांनी घेतली नाही. कारण त्यांना त्यांच्यानुसार साक्ष हवी होती. जे आम्ही पाहिलेच नाही, ते साक्षीत कसे नोंदवणार? वृक्षतोडीला खूप महिने झाले आहेत. तरी देखील दावा दाखल करण्यात आला नव्हता. एवढे दिवस का दिरंगाई झाली याचे कोडे समजत नाही.’’ साक्षीदार नसल्यामुळे एवढे दिवस दावा दाखल झाला नाही, असे आम्हाला महापालिका वकिलांनी सांगितले होते. त्यामुळे आम्ही आज साक्ष नोंदविण्यासाठी आलो. परंतु, वकिलांनी वेगळ्या प्रकारे आम्हाला लिहायला सांगितले ते आम्हाला मान्य नव्हते. म्हणून आम्ही याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार दिली आहे, असेही पाटील यांनी सांगितले. या वेळी पर्यावरणप्रेमी बिरेन भट, समीर निकम, युक्ता मुखी, प्रदीप रहेजा, महेश गोवडेलकर, सत्या नटराजन उपस्थित होते. 
 ..............................
कल्याणीनगर येथे काही महिन्यांपूर्वी शेकडो वृक्ष तोडण्यात आली. त्याबाबत संबंधितांना नोटीस बजावली होती. त्यांनी वृक्षतोडीची समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे अखेर आम्हाला महापालिका न्यायालयात दावा दाखल करावा लागला. 
- सुनील गायकवाड, क्षेत्रिय अधिकारी, नगर रोड कार्यालय  

Web Title: Everyone's eyes shocking... when the former'Miss World' comes in to record the testimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.