प्रत्येकाचा गुन्ह्यातील ‘रोल’ शोधून काढायचाय; ललित पाटीलसह दोघांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

By नम्रता फडणीस | Published: November 7, 2023 07:50 PM2023-11-07T19:50:46+5:302023-11-07T19:51:22+5:30

ससून रुग्णालयातून चालविण्यात येणाऱ्या अमली पदार्थ तस्करी रॅकेट प्रकरणी अटकेत असलेल्या ललित पाटील, रोहितकुमार चौधरी आणि शिवाजी शिंदे यांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली....

Everyone's 'role' in the crime has to be found out; Along with Lalit Patil, both are in police custody till November 13 | प्रत्येकाचा गुन्ह्यातील ‘रोल’ शोधून काढायचाय; ललित पाटीलसह दोघांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

प्रत्येकाचा गुन्ह्यातील ‘रोल’ शोधून काढायचाय; ललित पाटीलसह दोघांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

पुणे : अरविंद लोहरे या टोळीचा प्रमुख आहे. पुणे पोलिसांना त्याच्यासह तीन आरोपी या गुन्ह्यात पाहिजे आहेत. सध्या ते तिघेही मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रोडक्शन वॉरंट काढून त्यांना ताब्यात घ्यायचे आहे. त्यांचा ताबा घेऊन सर्व १४ आरोपींकडे एकत्रित तपास करायचा आहे. या प्रत्येकाचा गुन्ह्यातील ‘रोल’ शोधून काढायचा आहे, तसेच आरोपींचे अमली पदार्थ उत्पादन व विक्रीचे स्वरुप पाहता त्यांचे पुणे, मुंबई व नाशिकसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का, याचा सखोल तपास करायचा आहे, असे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान, ससून रुग्णालयातून चालविण्यात येणाऱ्या अमली पदार्थ तस्करी रॅकेट प्रकरणी अटकेत असलेल्या ललित पाटील, रोहितकुमार चौधरी आणि शिवाजी शिंदे यांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बंडगार्डन पोलिस ठाण्यात अमली पदार्थ तस्करी रॅकेटप्रकरणी दाखल गुन्ह्यात आतापर्यंत पुणे पोलिसांनी ११ आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी पाटील, चौधरी आणि शिंदे या तिघांची पोलिस कोठडी मंगळवारी संपली. त्यामुळे त्यांना शिवाजीनगर न्यायालयातील विशेष न्यायाधीश व्ही. ए. कचरे यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले.या दाखल गुन्हयातील अटक आरोपींकडून तपासात जप्त करण्यात आलेल्या जंगम मालमत्तेव्यतिरिक्त त्यांनी टोळीच्या माध्यमातून पुणे, मुंबई,नाशिक अथवा इतर ठिकाणी कोठे कोठे स्थावर जंगम मालमत्ता खरेदी केली आहे काय? याबाबत आरोपींना विश्वासात घेऊन तपास करायचा आहे असे सांगत यावेळी सरकारी वकील विजय फरगडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडत आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

शिक्षण जेमतेम पण "सायंटिस्ट" म्हणून ओळख

रोहितकुमार चौधरी बिहारच्या एका खेड्यातील तरुण. त्याचे जेमतेम शिक्षण झाले आहे. त्यामुळे मेफेड्रॉन बनविणे आणि त्याचे प्रशिक्षण देणे, हे चौधरीला शक्य नाही, असा दावा त्याच्या वकिलांनी केला. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याचा मेफेड्रॉन उत्पादनात महत्त्वाचा वाटा असल्याचे समोर आले आहे. चौधरी याचा नाशिकच्या शिंदेगावातील फॅक्टरीत मेफेड्रॉन बनविण्याचे प्रशिक्षण, उत्पादन व विक्रीत सहभाग आहे. त्यास ‘सायंटिस्ट’ नावाने संबोधले जात होते. या टोळीच्या म्होरक्या अरविंद लोहरे याचा असिस्टंट म्हणून चौधरी जबाबदारी पार पाडत होता, असे सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले.

Web Title: Everyone's 'role' in the crime has to be found out; Along with Lalit Patil, both are in police custody till November 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.