ews
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:09 AM2021-04-19T04:09:31+5:302021-04-19T04:09:31+5:30
केडगाव: ग्रामीण भागामध्ये कमी लक्षण असणारे कोरोना पॉझिटिव्ह होम क्वारंटाईन केलेले रुग्ण कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत. वैद्यकीय माहितीच्या ...
केडगाव: ग्रामीण भागामध्ये कमी लक्षण असणारे कोरोना पॉझिटिव्ह होम क्वारंटाईन केलेले रुग्ण कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत. वैद्यकीय माहितीच्या आधारे जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेेत त्यांनी कमीत कमी १५ ते १७ दिवस स्वतःला विलगीकरण करून घेतले पाहिजे. परंतु मी बरा झालो आहे या समजुती खाली अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पाचव्या ते सातव्या दिवशी बाहेर पडायला सुरुवात करत आहेत. मला कसलाच त्रास होत नाही, मला दम लागत नाही, माझा सॅचुरियन नॉर्मल अशा फुशारक्या मारत हे रुग्ण गावभर हिंडत असतात. मास्क न वापरल्यामुळे या रुग्णामुळे समोरच्या सामान्य नागरिकावर त्वरित कोरोनाचा प्रभाव होऊ शकतो. रुग्णांची संख्या वाढल्यामुुळे प्रशासनाचे कसलेही नियंत्रण नाही. प्रत्येक गावामध्ये विलगीकरण कक्ष नाही. याबाबत केडगावचे सरपंच अजित शेलार म्हणाले की, प्रशासन व शासन आपापल्या परीने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चांगले काम करीत आहे. सामान्य नागरिक म्हणून आपणही यामध्ये जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येकाने क्वारंटाईन, होम आयसोल्युशन ,मास्क वापर जबाबदारीने केला पाहिजे. तरच आपण कोरोनावरती नियंत्रण मिळवू शकतो.