ews and photo from santosh jadhav taleghar

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:09 AM2021-03-30T04:09:46+5:302021-03-30T04:09:46+5:30

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योर्तिर्लिंगापैकी सहावे ज्योर्तिर्लिंग आहे. वर्षभरामध्ये लाखो भाविक भक्त पर्यटक व निसर्गप्रेमी श्री क्षेत्र भीमाशंकराच्या ...

ews and photo from santosh jadhav taleghar | ews and photo from santosh jadhav taleghar

ews and photo from santosh jadhav taleghar

Next

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योर्तिर्लिंगापैकी सहावे ज्योर्तिर्लिंग आहे. वर्षभरामध्ये लाखो भाविक भक्त पर्यटक व निसर्गप्रेमी श्री क्षेत्र भीमाशंकराच्या दर्शनासाठी येत असतात. तर काही पर्यटक व निसर्गप्रेमी निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी येत असतात. या ठिकाणी येणारी वाहतूक ही सर्व मंचर घोडेगाव डिंभा तळेघर निगडाळे मार्ग भीमाशंकरला होत असते तर काही प्रमाणात राजगुरुनगर वाडा मंदोशी तळेघर निगडाळे मार्ग भीमाशंकरला होते.

गेले कित्येक वर्षांपासुन या ठिकाणी जाणारा निगडाळे ते भीमाशंकर हा चार ते पाच कि.मी. अंतर असणार्‍या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली होती. ह्या रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडुन हा रस्ता मृत्युचा सापळा बनला होता. यामुळे श्री क्षेञ भीमाशंकरला येणार्‍या भाविक भक्त पर्यटक व निसर्ग प्रेमींचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते अरुंद रस्ता व मोठ मोठाले खड्डे यामुळे येणार्‍यां भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.हा रस्ता दुरुस्ती न करण्याचे कारण म्हणजे हा रस्ता भीमाशंकर अभारण्य परिसरामध्ये असल्यामुळे वनविभागाकडुन परवानगी मिळत नव्हती. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी गेले कित्येक वर्षापासुन या रस्त्याबाबत राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वनविभागाशी वारंवार पाठपुरावा करून आता ह्या रस्ता दुरुस्तीसाठी परवानगी मिळवली. या नंतर लगेचच वळसे पाटील ह्यांनी भीमाशंकर ते निगडाळे या काॅंक्रिटीकरणांसाठी सात कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करुन दिला. महाशिवरात्रीनंतर वळसे पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. यानंतर लगेच ठेकेदाराने कामाला सुरुवात केली. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संमधीत ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे हे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीचे केले जात आहे.

--

निकृष्ट रस्ता

---

सिमेंट रस्ता सलग तयार न करता दोन कामांचे मध्ये सुमारे ४०० मिटरचे अंतर ठेवुन काम केले जात आहे. जुना असलेला डांबरी रस्ता खराब न करता त्यावरच खडी, कच व काही प्रमाणात सिमेंट मिक्स करून पाणी न वापरता सुके मटेरिअल वापरले जात आहे. सुके मटेरिअल पांगवल्यानंतर त्यावरून रोडरोलर फिरवला जात आहे. केलेल्या काॅंक्रिटीकरणावर पाणी ही मारले जात नाही. साईड पट्ट्याही मातीने भरल्या जात आहेत त्यामुळे पावसाळ्यामध्ये ह्या खचण्याची शक्यता आहे. या कामावरती सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही अधिकारी, वा कर्मचारी उपस्थित राहत नाही. तसेच संबंधित ठेकेदार सुध्दा उपस्थित राहत नाही.त्या मुळे मंजुर कामासाठी उपलब्ध असणार्‍या सात कोटी रुपयांचा चुराडा होत असल्याचे पहावयास मिळत आहे

--

कोट १

रस्त्याच्या कामाच्या निकृष्टतेबाबत तक्रार आली आहे. त्यामुळे त्याच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी शाखा अभियंदा महेशी परदेशी यांना सांगितले आहे. लवकरच त्याची चाचणी केली जाईल.

- सुरेश पठाडे, उपअभियंता

--

फोटो : तळेघर भीमाशंकर

फोटो मजकूर :क्षी क्षेत्र भीमाशंकर ते निगडारस्त्याचे काम

Web Title: ews and photo from santosh jadhav taleghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.