पैशांसाठी माजी बँक अधिकाऱ्याचा खुनाचा उलगडा, चार तरुण अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 11:51 PM2019-04-27T23:51:18+5:302019-04-27T23:51:49+5:30

औंधमधील उच्चभू्र सोसायटीमध्ये राहणाऱ्या बँक ऑफ इंडियाचे माजी कार्यकारी संचालक असलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या खुनाचा गुन्हा उलगड्यात चतु:श्रृंगी पोलिसांना यश आले आहे. 

Ex-bank official murdered for money, four youth detained | पैशांसाठी माजी बँक अधिकाऱ्याचा खुनाचा उलगडा, चार तरुण अटकेत 

पैशांसाठी माजी बँक अधिकाऱ्याचा खुनाचा उलगडा, चार तरुण अटकेत 

Next

पुणे : औंधमधील उच्चभू्र सोसायटीमध्ये राहणाऱ्या बँक ऑफ इंडियाचे माजी कार्यकारी संचालक असलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या खुनाचा गुन्हा उलगड्यात चतु:श्रृंगी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना अटक केली आहे़ त्यातील एक तरुण त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेचा मुलगा आहे़ चोरीच्या उद्देशानेच त्यांनी खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

कृष्णा देवेंद्र बडेकर (वय २४, रा. राजीव गांधी झोपडपट्टी खडकी), सैफ अली बाबूजी शेख (वय २२, रा. पवार वस्ती दापोडी), नदीम सलीम पठाण (२४, रा. दापोडी), मोसिन अकबर सय्यद (वय ३०, रा.  इलेवनसिटी दापोडी पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

गणेश पंढरीनाथ जातेगावकर (वय ८४, रा़ ब्लॉसम सोसायटी, औंध) असे खुन झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

औंध येथील ब्लॉसम सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये गणेश जातेगावकर यांचया मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. त्यांचे अ‍ॅक्सिस, स्टेट बँक, आयसीआयसी बॅकेचे एटीएम, डेबिट कार्ड चोरीला गेल्याचे व त्यावरुन पैसे काढण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यावरुन हल्लेखोरांनी चोरीच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे दिसून येत होते़ पोलिसांनी त्यांच्या खात्याची व त्यांच्या व्यवहाराची माहिती मिळविली़ तेव्हा लोणावळा, वरळी, मुंबई, पनवेल या ठिकाणाहून व्यवहार झाल्याचे दिसून आले़ त्यानंतर पोलिसांनी ज्या एटीएममधून पैसे काढले गेले, त्यातील व परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले़ त्यावरुन त्यांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन कृष्णा बडेकर व इतर तिघांना ताब्यात घेतले़ चौकशीत त्यांनी खून केल्याची कबुली दिली़ 

यातील कृष्णा बडेकर याची आई गणेश जातेगावकर यांच्या घरी काम करीत होती़ त्यामुळे कृष्णाचेही तेथे जाणे येणे होते़ त्यांनी जातेगावकर यांच्या फ्लॅटची डुप्लिकेट चावी तयार केली़ त्यानंतर या चावीचा वापर करुन त्यांनी घरात प्रवेश केला़ जातेगावकर यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली़ परंतु त्यांनी पैसे नसल्याचे सांगितले़ तेव्हा त्यांनी पुन्हा कोयत्याचा धाक दाखवून त्यांचे एटीएम कार्ड व त्याचा पीन नंबर विचारुन घेतला़ त्याचवेळी त्यांनी कृष्णा याला ओळखले़ त्यामुळे कृष्णा बडेकर व मोसिन सय्यद यांनी जातेगावकर यांचे हात पकडून धरले़ नदीम शेख याने त्यांच्या तोंडावर उशी दाबून त्यांचा खुन केला़ चौकशीत आरोपींनी ही बाब सांगितले़ 

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहाय्यक पोलीस आयुक्त देवीदास पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे वैशाली गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम फड, पोलीस नाईक सारस साळवी, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, पोलीस हवालदार प्रदिप खळदकर ,बाळू गायकवाड एकनाथ जोशी ,मुकुंद तारू, दादासो काळे, अजय गायकवाड, विशाल साबळे, तेजस चोपडे, अमर शेख यांनी केली आहे. 

Web Title: Ex-bank official murdered for money, four youth detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.