एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:46 AM2018-04-14T00:46:42+5:302018-04-14T00:46:42+5:30

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या तीन माजी विद्यार्थ्यांनी ६५ व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली आहे.

Ex-FTII students get national award | एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर

एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर

Next

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या तीन माजी विद्यार्थ्यांनी ६५ व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली आहे. माजी विद्यार्थ्यांच्या डिप्लोमा फिल्म्सची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने एफटीआयआयच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
६५ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. त्यामध्ये एफटीआयच्या तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. अरुण कृपास्वामी या दिग्दर्शन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने दिग्दर्शित केलेल्या ‘मंडे’ या डिप्लोमा फिल्मला रजत कमळ आणि ५० हजार रुपयांचे स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्ड, तसेच टीव्ही विभागाच्या मेधप्रणव पोवार याने केलेल्या ‘हॅपी बर्थ डे’ला ‘बेस्ट फिल्म आॅन फॅमिली व्हॅल्यूज अ‍ॅवॉर्ड’ तर स्वप्निल कापुरे याच्या ‘भरदुपारी’ला ‘स्पेशल मेन्शन अ‍ॅवॉर्ड’ जाहीर झाले आहे. आपल्या कामाला राट्रीय पुरस्कार मिळणे हा सर्वोच्च सन्मान असल्यासारखे आहे. यामुळे आत्मविश्वास दुणावला असून, जबाबदारीही वाढली असल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
>एफटीआयआयकडून शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या डिप्लोमा फिल्म्सची निवड करून विविध महोत्सव आणि पुरस्कारांसाठी त्या फिल्म पाठविल्या जातात. माझ्या फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, याच्याच ‘शॉक’मध्ये मी अजून आहे. तंत्रज्ञान कंपन्या आपला कशा पद्धतीने वापर करत आहेत, यावर फिल्ममध्ये भाष्य करण्यात आले आहे.
- अरुण कृपास्वामी, माजी विद्यार्थी
>मी मूळचा जळगावचा. शिवणकाम हा कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय. थिएटरची आवड असल्याने पुण्यात आलो. डिप्लोमा इन कम्युनिकेशन स्टडीजची पदवी मिळविली. गाभ्रीचा पाऊस, लूज कंट्रोल अशा चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शन केले. पण कलेच्या शिक्षणासाठी एफटीआयआयला प्रवेश घ्यावा, असे वाटले. पण दोनदा संधी हुकली. नंतर प्रवेश मिळाला. शेवटच्या वर्षात केलेल्या ’भरदुपारी’ या फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, याचा खूप आनंद आहे. या फिल्ममध्ये ज्या घटनेशी आपला संबंध नसतो त्या घटनेमध्ये कसे गुरफटत जातो, असे कथानक मांडण्यात आले आहे.
- स्वप्निल कापुरे, माजी विद्यार्थी
>पुरस्कार जाहीर झाल्याचा खूप आनंद आहे. एका सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधणारी माझी फिल्म आहे. समाज एका विशिष्ट कामाला कोणत्या नजरेतून पाहतो यावर ‘हॅपी बर्थडे’ची निर्मिती करण्यात आली आहे. व्यावसायिक चित्रपट बनवा पण सामाजिक प्रबोधनपर चित्रपटही तयार करा, अशा स्वरूपाचे स्वातंत्र्यही आम्हाला एफटीआयआयकडून मिळाले आहे.
- मेधप्रणव पोवार, माजी विद्यार्थी

Web Title: Ex-FTII students get national award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.