डॉक्टरच्या वाहनाने दिलेल्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:26+5:302021-07-17T04:10:26+5:30

लक्ष्मण ज्ञानदेव आढाळगे,(रा. जाधववाडी, ता. पुरंदर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. अपघातानंतर त्यांच्याच रुग्णालयात परस्पर ...

Ex-serviceman killed in collision with doctor's vehicle | डॉक्टरच्या वाहनाने दिलेल्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यू

डॉक्टरच्या वाहनाने दिलेल्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यू

Next

लक्ष्मण ज्ञानदेव आढाळगे,(रा. जाधववाडी, ता. पुरंदर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. अपघातानंतर त्यांच्याच रुग्णालयात परस्पर नेऊनही उपचारात हयगय केल्याने त्यांच्या नातेवाइकांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये डॉ. हेंद्रे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याने पोलिसांनी सासवड येथील प्रसिद्ध धन्वंतरी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमोल हेंद्रे यांच्यावर अपघातासह जातीवाचक शिवीगाळ केल्याचा दुहेरी गुन्हा दाखल केला आहे. निखिल लक्ष्मण आढाळगे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जखमीच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परंतु उपचार व्यवस्थित होत नसल्याचा आरोप करून रुग्णाला पुणे येथे नेण्याचा आग्रह त्यांनी केला. त्यावेळी डॉ. हेंद्रे यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना जातीवाचक शिवीगाळ करून हुज्जत घातली. परंतु प्रकृती खूपच खालावत चालल्याने त्यांना तातडीने पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

दरम्यान, घटना घडल्यानंतर तीन दिवस होऊनही पोलिसांनी आमची दखल घेतली नाही, असा आरोप करून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही, असा माजी सैनिकाच्या नातेवाइकांनी पवित्रा घेतला. तसेच मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात आणून याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढून लगेच गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली. त्यानुसार पोलिसांनी डॉ. अमोल हेंद्रे यांच्या विरोधात हयगयीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत आणि फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करणे, असा दुहेरी गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के हे पुढील तपास करीत असल्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. ———————————————————————————————

फोटो - मयत माजी सैनिक लक्ष्मण आढाळगे यांचा फोटो.

Web Title: Ex-serviceman killed in collision with doctor's vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.