परीक्षा विभागाचा हलगर्जीपणा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 07:35 AM2017-07-26T07:35:34+5:302017-07-26T07:35:54+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा आणखी एक प्रताप ऊजेडात आला आहे, एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजचे ११ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित असतानाही त्यांना अनुपस्थित दाखवून नापास करण्यात

Exam department Indigestion in pune university | परीक्षा विभागाचा हलगर्जीपणा उघड

परीक्षा विभागाचा हलगर्जीपणा उघड

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा आणखी एक प्रताप ऊजेडात आला आहे, एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजचे ११ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित असतानाही त्यांना अनुपस्थित दाखवून नापास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ऊजेडात आला आहे. विद्यार्थ्यांनी पुराव्यानिशी परीक्षा विभागात
धाव घेतली असता
विभागातील अधिकाºयांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आले आहे.
याबाबत अनिकेत इंगोले याने सांगितले, की आम्हाला गुणपत्रिका मिळाल्यानंतर हा प्रकार समजला, त्यानंतर आम्ही विद्यापीठात जाऊन याबाबत विचारणा केली असता परीक्षा विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आम्ही आतापर्यंत ४ ते ५ वेळा त्यांना भेटून याबाबतचे निवेदन दिले मात्र त्यांच्याकडून काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.’’
अक्षय पवार म्हणाला, ‘‘आम्हाला अनुपस्थित दाखविण्यात आल्याचे गुणपत्रिकेत दिसून आल्यानंतर आम्ही लगेच परीक्षा विभागाशी संपर्क साधला, त्यानंतर
२ ते ३ दिवसांत तुम्हाला
सुधारित गुणपत्रिका देण्यात येईल, असे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले होते मात्र अद्याप आम्हाला गुणपत्रिका देण्यात आली नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत एमबीएला
प्रवेश घेण्याची मुदत संपत आहे. त्यामुळे आमचे संपूर्ण वर्ष वाया जाणार आहे.’’
याबाबत परीक्षा विभागाचे संचालक अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

परीक्षेला अनुपस्थित दाखविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांची निवड ही कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे कंपन्यांमध्ये झाली आहे, त्यांना तिथे कागदपत्रे सादर करायची आहेत, तर काही विद्यार्थ्यांना एमबीएला प्रवेश घ्यायचा आहे. मात्र परीक्षा विभागाच्या नाहक निष्काळजीपणामुळे त्यांचे करिअर धोक्यात आले आहे. चूक लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांच्याकडून काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मे २०१७ मध्ये पार पडली. एमआयटी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला असलेल्या ११ विद्यार्थ्यांनी मोबाईल कॉम्प्युटिंग परीक्षा दिली होती. त्यानंतर १५ दिवसांपूर्वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असता या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये त्यांना या विषयामध्ये अनुपस्थित दाखवून नापास करण्यात आले. याबाबत जनता दल युनायटेडचे पदाधिकारी कुलदीप आंबेकर यांनी कुलगुरुंनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित अधिकारी व कर्मचाºयांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Exam department Indigestion in pune university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.