नारायणगावात आरोग्य शिबिरात १९७ मुलांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:11 AM2021-09-24T04:11:59+5:302021-09-24T04:11:59+5:30

नारायणगाव : संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘जगदंब प्रतिष्ठान’ आयोजित १४ वर्षांखालील लहान मुलांचे ...

Examination of 197 children in Narayangaon health camp | नारायणगावात आरोग्य शिबिरात १९७ मुलांची तपासणी

नारायणगावात आरोग्य शिबिरात १९७ मुलांची तपासणी

Next

नारायणगाव : संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘जगदंब प्रतिष्ठान’ आयोजित १४ वर्षांखालील लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिरात १९७ मुलांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. ज्या मुलांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, अशा मुलांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर कोल्हे यांनी सांगितले.

या शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मातोश्री श्रीमती रंजना रामसिंग कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार पोपटराव गावडे, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, युवा नेते अमित बेनके, पांडुरंग पवार, भाऊ देवाडे, मोहित ढमाले, सागर कोल्हे, बाळासाहेब खिलारी, सभापती विशाल तांबे, सूरज वाजगे, डी. डी.भोसले, डॉ. सदानंद राऊत, विक्रम भोर, गुलाब नेहरकर, गणपतराव कवडे, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, तान्हाजी डेरे, दिलीप कोल्हे, बी. एस. कोल्हे, अमोल हरपळे, सचिव आशिष हांडे उपस्थित होते.

मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालय, तसेच पुण्यातील डी. वाय. पाटील रुग्णालय, भारती हॉस्पिटल, देसाई आय हॉस्पिटल या नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टर्सच्या उपस्थितीत हृदयाचे छिद्र, अस्थिव्यंग, मेंदूतील गाठ, मणक्यातील गॅप, कर्णबधीर, तिरळेपणा, अर्धांगवायू, किडनी आजार असलेल्या १४ वर्षांखालील लहान मुलांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात डॉ. देविश आघारा, डॉ. आयुष जैन, डॉ. प्रियांका बोस, डॉ. ऐश्वर्या, डॉ. कीर्ती, डॉ. नीलम खानल, डॉ. सोनम विटकर, डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ. फजाज, डॉ. प्रसाद नुरे, डॉ. संकेत कर्णिक, डॉ. आसावरी तावडे, डॉ. श्रीरंग करंदीकर, डॉ. दिनेश जांगडे आदी सहभागी झाले होते. डॉ. मते हॉस्पिटल, डॉ. स्वप्निल मते, डॉ. अजय मते, डॉ. सदानंद राऊत, डॉ. सागर फुलवडे आदींनी शिबिरासाठी आवश्यक व तांत्रिक सहकार्य केले. शिबिराचे नियोजन जगदंब प्रतिष्ठानचे अमोल हरपळे, आशिष हांडे, अतुल आहेर, तुषार डोके, तेजस झोडगे, संकेत कोल्हे, सुहास लोंढे, राजेंद्र कोल्हे, नितीन कोल्हे, राजेंद्र कोल्हे, रामदास अभंग, विजय कोल्हे, मिलिंद कोल्हे, अरुण काकडे, हेमंत कोल्हे, श्रेयस झोडगे, सागर जाधव आदींनी नियोजन केले.

फोटो - जगदंब प्रतिष्ठान’ आयोजित लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना श्रीमती रंजना कोल्हे व इतर.

Web Title: Examination of 197 children in Narayangaon health camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.