सुपर स्प्रेडर सर्वेक्षणात २३ हजार ६४५ जणांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:15 AM2021-08-13T04:15:53+5:302021-08-13T04:15:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाबाधित आटोक्यात आलेले नाही. यामुळे जिल्हा परिषदेमार्फत सुपर स्प्रेडर सर्वेक्षण ...

Examination of 23 thousand 645 people in Super Spreader Survey | सुपर स्प्रेडर सर्वेक्षणात २३ हजार ६४५ जणांची तपासणी

सुपर स्प्रेडर सर्वेक्षणात २३ हजार ६४५ जणांची तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाबाधित आटोक्यात आलेले नाही. यामुळे जिल्हा परिषदेमार्फत सुपर स्प्रेडर सर्वेक्षण गेल्या काही महिन्यांपासून राबिवले जात आहे. गेल्या १५ दिवसांत २३ हजार ६४५ जणांची तपासणी करण्यात आली असून, यात १ हजार ११६ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आशा सर्वेक्षण, फिवर क्‍लिनिक आणि सुपर स्प्रेडर सर्वेक्षण केले जात आहे. आशा सेविकांनी गृहभेटीतून ४ हजार ७८७ संशयितांची कोरोना चाचणी केली. त्यात ३६१ जण बाधित आढळले. फिवर क्‍लिनिकमध्ये ४६ हजार ८८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४ हजार ७५ जण संशयित होते. त्यांची चाचणी करण्यात आली असून ४५३ बाधित आढळले. बाजारपेठेतील दुकानदार व नागरिकांशी थेट संपर्कात असणाऱ्या सुपर स्प्रेडर असलेल्या २२ हजार ९९० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील १४ हजार ७६३ संशियतांपैकी ३०२ जण बाधित आढळले आहेत.

Web Title: Examination of 23 thousand 645 people in Super Spreader Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.