केडगाव येथील सर्वरोगनिदान शिबिर ५०० रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:49+5:302021-07-29T04:10:49+5:30

यावेळी आमदार नीलेश लंके, माजी आमदार रमेश थोरात, डॉ. वंदना मोहिते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अप्पासाहेब पवार, सभापती हेमलता ...

Examination of 500 patients at Sarva Diagnosis Camp at Kedgaon | केडगाव येथील सर्वरोगनिदान शिबिर ५०० रुग्णांची तपासणी

केडगाव येथील सर्वरोगनिदान शिबिर ५०० रुग्णांची तपासणी

Next

यावेळी आमदार नीलेश लंके, माजी आमदार रमेश थोरात, डॉ. वंदना मोहिते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अप्पासाहेब पवार, सभापती हेमलता फडके, उपसभापती सयाजी ताकवणे, पोपटराव ताकवणे, भाऊ साहेब ढमढेरे, लक्ष्मण दिवेकर, मीना धायगुडे, उत्तम ताकवले, आश्लेषा शेलार, संभाजी ताकवणे,विशाल शेलार, पद्माकर देशमुख संतोष ईलाबाद अभय पितळे, डॉ. दिनेश मोहिते उपस्थित होते.

आमदार लंके म्हणाले की, मोहिते हॉस्पिटलच्या माध्यमातून आतापर्यंत चार हजार २०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या. कोविडकाळात ५०० रुग्ण बरे केले. रेमडेसिविरशिवाय अनेक रुग्ण बरे केले. वंदना मोहिते यांनी दक्षता समितीच्या माध्यमातून अनेक मोडलेले संसार परत एकत्र केले. कोविड सेंटरमधून १८ हजार रुग्ण बरे झाले.

माजी आमदार आमदार रमेश थोरात म्हणाले की कोविड काळामध्ये केलेल्या कामामुळे नीलेश लंके यांना प्रमोशन मिळणार आहे. बारामती डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉक्टर वंदना मोहिते म्हणाल्या की,२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनता पाठीशी असताना आम्ही कार्यकर्ते कमी पडल्याने थोरात यांचा निसटता पराभव झाला. आगामी २०२४ मध्ये वरील चूक भरून काढणार आहोत. सूत्रसंचालन दत्ता सस्ते,संजय गरदडे यांनी केले.

२८ केडगाव

केडगाव येथे सर्वरोगनिदान शिबिराचे उद्घाटन करताना आमदार नीलेश लंके, रमेश थोरात, डॉ. वंदना मोहिते.

Web Title: Examination of 500 patients at Sarva Diagnosis Camp at Kedgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.