मांडवगण फराटा येथे ६०० मुलांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:56+5:302021-07-03T04:07:56+5:30
रावलक्ष्मी ट्रस्ट व हिराबाई कावसजी जहांगीर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात ...
रावलक्ष्मी ट्रस्ट व हिराबाई कावसजी जहांगीर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने मुले ही घरीच होती. या मुलांच्या आरोग्यात काय बदल झाला आहे का? हे पाहण्यासाठी खास मुलांसाठी आरोग्य शिबिराची गरज ओळखून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्या मुलांमध्ये काही आजार आढळून आले त्याच्यावर रावलक्ष्मी ट्रस्टच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी दिली. या शिबिरामध्ये १ ते १८ वयोगटातील मुला-मुलींचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून हिमोग्लोबिन, वजन, उंची, कॅल्शियम, हाडांची तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. शिबिरामध्ये मुलांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. सहभागी मुलांना मास्क व खाऊ देण्यात आला.
मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मुलांच्या वाढत्या वयानुसार वजन व उंची योग्यप्रमाणे वाढ होते की नाही याची मोफत तपासणी करण्यात आली. त्यांना मोफत औषधे दिले जात असल्याचे डॉ. संध्या गायकवाड यांनी सांगितले. यावेळी घोडगंगाचे संचालक बाबासाहेब फराटे, संभाजी फराटे, धनंजय फराटे, दत्तात्रय फराटे, राजेंद्र पोळ, शरद चकोर, बाबापाटील फराटे, लतिका वराळे, प्रतिभा बोत्रे, मनीषा सोनवणे, रूपाली ढवळे, प्रतीक्षा जगताप उपस्थित होते.
यावेळी जहांगिर हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली लडकत, मुख्य समन्वयक संध्या गायकवाड, डॉ. शीतल भोर, डॉ. चिरंतप ओझा, सुवर्णा अरबुज, अनघा देशमुख तसेच त्याच्या २० कर्मचाऱ्यांच्या पथकाने शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.
फोटोओळी: मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे रावलक्ष्मी ट्रस्टकडून आयोजित शिबिरात मुलांची तपासणी करताना आरोग्य कर्मचारी.