एनसीसी सी प्रमाणपत्राची उद्यापासून परिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:12 AM2021-04-02T04:12:30+5:302021-04-02T04:12:30+5:30
प्रात्यक्षिक परिक्षा यामध्ये कमांड देणे, रायफलची जोडणी, मॅप रिडींग आदी बाबी असणार असून ती तीन एप्रील रोजी होणार असून ...
प्रात्यक्षिक परिक्षा यामध्ये कमांड देणे, रायफलची जोडणी, मॅप रिडींग आदी बाबी असणार असून ती तीन एप्रील रोजी होणार असून लेखी परिक्षा चार एप्रील रोजी होणार आहे. पुणे शहारातील परिक्षा फर्ग्यसन महाविद्याल, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, गरवारे वाणिज्य महाविद्यालय येथे होणार आहेत.
या परिक्षेसाठी पुणे ग्रूप मधील एकूण १हजार ५९७ छात्र सहभागी होणार आहेत. त्यामध्ये १हजार १३२ छात्र पुणे शहर व जिल्ह्यातील आहेत तर ४६५ छात्र सोलापूर विभागातील आहेत. या विद्यार्थ्यांनी परिक्षेला जाताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे व कोरोनाच्या नियमांचे पालन करावे अशा सक्त सुचना देण्यात आल्या आहेत. तर छात्रांना परिक्षेसाठी परिक्षा केंद्रापर्यंत जाताना पोलिस व प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.