परीक्षा आनंददायी होणे गरजेचे : गंगाधर म्हमाणे; अनिल गुंजाळ यांच्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 03:37 PM2018-02-06T15:37:36+5:302018-02-06T15:40:45+5:30

यशोदीप पब्लिकेशन्सतर्फे उपशिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी लिहिलेल्या ‘माणसापरास’ आणि ‘परीक्षा : एक आनंददायी अनुभव’ या पुस्तकांचे प्रकाशन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि म्हमाणे यांच्या हस्ते झाले.

Examination should be pleasant: Gangadhar Mhamane; Publication of Anil Gunjal's book in Pune | परीक्षा आनंददायी होणे गरजेचे : गंगाधर म्हमाणे; अनिल गुंजाळ यांच्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

परीक्षा आनंददायी होणे गरजेचे : गंगाधर म्हमाणे; अनिल गुंजाळ यांच्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थी आणि पालकांना तणावमुक्त ठेवण्यासाठी राज्य मंडळ नेहमीच मदत करते : म्हमाणेश्रीपाल सबनीस आणि म्हमाणे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी आणि पालकांना तणावमुक्त ठेवण्यासाठी राज्य मंडळ नेहमीच मदत करते. सर्व परीक्षार्थी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. त्यासाठी परीक्षा आनंददायी होणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी व्यक्त केले.
यशोदीप पब्लिकेशन्सतर्फे उपशिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी लिहिलेल्या ‘माणसापरास’ आणि ‘परीक्षा : एक आनंददायी अनुभव’ या पुस्तकांचे प्रकाशन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि म्हमाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 
ते म्हणाले, ‘परीक्षा आनंदी होण्याबरोबरच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. पुढील पिढी सुसंस्कृत होण्यासाठी प्रयत्न केल्यास प्रत्येक माणूस सुखी होईल, यात शंका नाही.’
रुपाली अवचरे यांनी प्रास्ताविक केले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लता गुंजाळ, सोनल गुंजाळ, स्वप्नील गुंजाळ, निखिल लंभाते, माधुरी काळभोर आदींनी सहकार्य केले.

Web Title: Examination should be pleasant: Gangadhar Mhamane; Publication of Anil Gunjal's book in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.