करंदी नेत्रतपासणी शिबिरात साडेतीनशे लोकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:16 AM2021-08-17T04:16:30+5:302021-08-17T04:16:30+5:30
कोरोनाकाळात ग्रामीण भागातील जनता दवाखान्यात जाण्यास घाबरत होती, त्यामुळे डोळ्यांच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत होत्या. त्यामुळे या शिबिराचे ...
कोरोनाकाळात ग्रामीण भागातील जनता दवाखान्यात जाण्यास घाबरत होती, त्यामुळे डोळ्यांच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत होत्या. त्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे जांभळकर यांनी सांगितले. या शिबिराचा सुमारे ३४३ जणांनी लाभ घेतला व त्यातील ४१ जणांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, ११० जणांना अल्पदरात चष्मे देण्यात येणार आहेत. या वेळी रोटरी क्लबच्या रूपाली मंदार पवार, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी दरेकर, पांडुरंग ढोकले, संदीप ढोकले, नितीन ढोकले,अंकुश पंचमुख,शोभा दरेकर, सुनीता ढोकले,सोनाली ढोकले, रेखा खेडकर, उज्ज्वला नप्ते, ग्राम विकास अधिकारी दिलीप पानसरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक :१६ केंदूर नेंत्र तपासणी
फोटो ओळ- करंदी, ता. शिरूर येथील नेत्र शिबिरात सहभागी झालेले ग्रामस्थ.