संकल्प प्रकल्पांतर्गत कैद्यांना देता येणार व्यावसायिक कोर्सेसची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:14 AM2021-09-09T04:14:41+5:302021-09-09T04:14:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय कौशल्य विकास मोहिमेतंर्गत संकल्प प्रकल्प सुरू करण्यात ...

Examination of vocational courses can be given to prisoners under Sankalp project | संकल्प प्रकल्पांतर्गत कैद्यांना देता येणार व्यावसायिक कोर्सेसची परीक्षा

संकल्प प्रकल्पांतर्गत कैद्यांना देता येणार व्यावसायिक कोर्सेसची परीक्षा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय कौशल्य विकास मोहिमेतंर्गत संकल्प प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याकरिता प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये पुणे जिल्हयाचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत आता कैद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण कोर्सेसची परीक्षा देता येणार अहे.

याबाबत कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी सांगितले की, या प्रकल्पांतर्गत प्रथमच येरवडा कारागॄहात काम करणाऱ्या चर्मोद्योग उद्योगातील कुशल अशा २५ कैद्यांना चर्मोद्योग क्षेत्र कौशल्य परिषदेमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचे निकाल प्राप्त झाले असून, सर्व २५ बंदीजन उत्तीर्ण झाले आहेत. शासनमान्य कौशल्य विकास प्रमाणपत्राच्या आधारे कारावासातून बंदीजनांची सुटका झाल्यानंतर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आत्मनिर्भर होवून सन्मानाने जगण्याकरिता नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.

उत्तीर्ण कैद्यांना कौशल्य प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम नुकताच येरवडा मध्यवर्ती कारागृहात पार पडला. यावेळी कारागृह अधीक्षक यू. टी. पवार, कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार, अतिरिक्त अधीक्षक राणी भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी जी. के. भोसले, नितीन क्षीरसागर, सोमनाथ म्हस्के, सुभेदार प्रकाश सातपुते, शिक्षक अंगत गव्हाणे यांच्यासह बंदीजन उपस्थित होते.

संकल्प प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या काही विशेष बाबी प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथील कैद्यांना कौशल्य पडताळणी तज्ज्ञांमार्फत करून पूर्व ज्ञान मान्यता अंतर्गत त्यांचे प्रमाणीकरण करणे व केंद्र शासनामार्फत कौशल्य कसोटीमध्ये उत्तीर्ण लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देणे प्रस्तावित करण्यात आले होते.

Web Title: Examination of vocational courses can be given to prisoners under Sankalp project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.