सेझ रस्त्यावरील खड्डे बुजवले, लोकमत न्यूज इम्पॅक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:08 AM2018-11-12T00:08:35+5:302018-11-12T00:09:01+5:30

प्रशासन खडबडून जागे : वारंवार अपघात होत असल्याने होती मोठी समस्या

The excavation on the SEZ road, the Lokmat News Impact | सेझ रस्त्यावरील खड्डे बुजवले, लोकमत न्यूज इम्पॅक्ट

सेझ रस्त्यावरील खड्डे बुजवले, लोकमत न्यूज इम्पॅक्ट

Next

रेटवडी : खेड तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील राजगुरुनगर ते रेटवडी या सेझ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले ते बुजवण्यात आले आहेत. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रकाशित करून वस्तुस्थिती समोर आणली होती. या वृत्ताने प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी रस्त्याची डागडुजी केली आहे.

आठवड्यापूर्वी सेझ रस्त्याचे साम्राज्य या बातमी अंतर्गत खेड तालुक्याच्या पूर्व भागातील राजगुरुनगर ते रेटवडी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे येथे वारंवार अपघात झाले आहेत. त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने प्रशासनाचे दुर्लक्ष लोकांसमोर आणल्यामुळे तातडीने त्याची दखल घेत सेझ रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजविण्यात आले आहेत.
अपघात टाळण्यासाठी रस्त्याची डागडुजी केली; परंतु ही डागडुजी तात्पुरती स्वरुपाची आहे. खड्डे बुजवण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे ग्रामस्थ या कामकाजावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.
सेझसारख्या रस्त्यावर वारंवार अपघात होऊनही प्रशासन दखल घेत नव्हते. केवळ लोकमत वृत्तसमूहाच्या रेट्यामुळे हे काम केले आहे. परंतु हे काम तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. हे बुजवलेले खड्डे काही दिवसांच्या आत तेथे पुन्हा पडतील आणि रस्त्याची अवस्था पहिल्यासारखीच होईल, असे मत सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनंजय विलास बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले. अपघात टाळण्यासाठी योग्य ते फलक, स्पीडब्रेकर, अपघातप्रवण क्षेत्र असे फलक लावून शेतरस्त्याचे मजबूत काम करण्यात यावे, असे सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध वकील अ‍ॅड. विजय रेटवडे यांनी मत व्यक्त केले.

दुरुस्तीचे काम मात्र निकृष्ट दर्जाचेच
सेझसारख्या रस्त्यावर वारंवार अपघात होऊनही प्रशासन दखल घेत नव्हते. केवळ ‘लोकमत’ वृत्तसमूहाच्या रेट्यामुळे हे काम केले आहे.
अपघात टाळण्यासाठी रस्त्याची डागडुजी केली; परंतु ही डागडुजी तात्पुरती स्वरुपाचीच आहे. खड्डे बुजवण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे ग्रामस्थ या कामकाजावर अत्यंत नाराज असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: The excavation on the SEZ road, the Lokmat News Impact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे