महिनाभरापूर्वी केलेल्या फुटपाथवर उखडून खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:09 AM2021-05-30T04:09:55+5:302021-05-30T04:09:55+5:30

पुणे : महानगरपालिकेने महापौर निधीमधून मार्च महिन्यात तयार करण्यात आलेले पदपथ पुन्हा उखडण्यात आले आहेत. निविदा न काढताच या ...

Excavation on the sidewalk done a month ago | महिनाभरापूर्वी केलेल्या फुटपाथवर उखडून खोदकाम

महिनाभरापूर्वी केलेल्या फुटपाथवर उखडून खोदकाम

Next

पुणे : महानगरपालिकेने महापौर निधीमधून मार्च महिन्यात तयार करण्यात आलेले पदपथ पुन्हा उखडण्यात आले आहेत. निविदा न काढताच या ठिकाणी काम सुरू करण्यात आले असून पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. प्रभाग क्र. १९ मध्ये भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाशेजारीच हा प्रकार सुरू असून, आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली आहे.

भवानी पेठ येथील घंघाळे पथ येथे लाखो रुपये खर्च करून पदपथ तयार करण्यात आले होते. त्याच ठिकाणी आता

बिगर निविदा खोदकाम केले जात आहे. आधीच्या कामांची नासधूस करून पालिकेचे लाखो रुपयांचे

आर्थिक नुकसान केले जात आहे. हे बेकायदेशीर काम थांबवून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बागवे यांनी केली.

Web Title: Excavation on the sidewalk done a month ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.