जादा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 04:13 AM2018-10-31T04:13:38+5:302018-10-31T04:14:19+5:30

दिवाळीच्या उत्साहात मोठे फटाके व १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाºया फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरास शहर पोलीस दलाने बंदी घातली आहे. त्याचबरोबर चिनी उडत्या आकाश कंदिलांवरही मनाई कायम करण्यात आली आहे. 

Excess burns crackers ban | जादा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी

जादा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी

Next

पुणे : दिवाळीच्या उत्साहात मोठे फटाके व १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाºया फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरास शहर पोलीस दलाने बंदी घातली आहे. त्याचबरोबर चिनी उडत्या आकाश कंदिलांवरही मनाई कायम करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत दोन तास फटाके उडविण्यास परवानगी दिली असली तरी पुणे पोलिसांनी काढलेल्या आदेशात रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत कोणत्याही प्रकारचा ध्वनी निर्माण करून आवाजाचे प्रदूषण करणाºया फटाक्यांवर संपूर्ण मनाई करण्यात आली आहे.

सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी हा आदेश काढला असून, ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान ही बंदी घालण्यात आली आहे़
कोणत्याही रस्त्यावर किंवा कोणत्याही रस्त्यापासून ५० फुटाच्या आत कोणतेही फटाके स्वैरपणे उडविणे किंवा दारूकाम सोडणे किंवा फेकणे अगर फायर बलून किंवा अग्निबाण सोडण्याला मनाई करण्यात आली आहे.

एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरावर १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाºया फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे़ तसेच फटाक्यांची माळ ५० ते १०० तसेच १०० व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे ११० /११५ व १२५ डेसिबल ऐवढी असावी़ त्यापेक्षा जास्त आवाज निर्माण करणाºया सर्व फटाक्यांच्या माळांवर बंदी घालण्यात आली आहे.

आकाशात पेटते आकाशकंदील सोडण्याच्या प्रकारात गेल्या काही वर्षांपासून वाढ झाली होती़ असे चिनी आकाशकंदील दिवाळीच्या पहिल्या दिवशी व पाडव्याला सारसबागेसारख्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन पेटते आकाशकंदील सोडले जात होते. हे पेटते आकाशकंदील उंच गेल्यावर झाडाला तसेच इमारतीवर पडून आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या़ त्यामुळे शहर पोलीस दलाने गेल्या वर्षी त्याच्या विक्री व वापरावर बंदी घातली होती़ यंदाही या चिनी उडत्या आकाशकंदिलांवर बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: Excess burns crackers ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.