जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना जास्त कर्जपुरवठा : भरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:26+5:302021-09-13T04:09:26+5:30

लासुर्णे (ता. इंदापूर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे एटीएम सेवेची सुरुवात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शनिवार ...

Excess loan from District Bank to farmers: Repayment | जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना जास्त कर्जपुरवठा : भरणे

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना जास्त कर्जपुरवठा : भरणे

googlenewsNext

लासुर्णे (ता. इंदापूर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे एटीएम सेवेची सुरुवात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शनिवार (दि ११ ) करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकाळ, छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, डॉ. योगेश पाटील , राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, सरपंच सागर पाटील, उपसरपंच उल्हास जाचक, गणेश फडतरे, मनोज कुलकर्णी, राजेश खरात, सचिन खरवडे, विभागीय अधिकारी आनंद थोरात लासुर्णे शाखा व्यवस्थापक बाळासाहेब थोरात, विकास अधिकारी सुदाम खरात उपस्थित होते.

भरणे म्हणाले की, लासुर्णे येथील पाणीपुरवठा योजनेसाठी पाच कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर केला आहे. सर्व वाड्या-वस्त्यांवर शुद्ध प्रक्रिया केलेला पिण्यायोग्य पाणीपुरवठा होईल. तसेच कर्दनवाडी -मांकरवाडी रस्त्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. यामुळे रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला. तालुक्यातील बावीस गावांचा शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा ही मार्ग लवकरच मोकळा होणार असून. त्यामुळे भविष्यात तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची अडचण येणार नाही.

लासुर्णे येथील पुणे जिल्हा बँकेच्या एटीएम सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

१२०९२०२१-बारामती-०१

Web Title: Excess loan from District Bank to farmers: Repayment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.