आळंदीत वारकरी संस्था चालकाकडून चिमुकल्यावर अतिप्रसंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:10 AM2021-05-19T04:10:14+5:302021-05-19T04:10:14+5:30
शिवप्रसाद रामनाथ भोकनळ (वय २१, रा. सिध्दबेट, केळगाव मूळ रा. वंडागळी, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे ...
शिवप्रसाद रामनाथ भोकनळ (वय २१, रा. सिध्दबेट, केळगाव मूळ रा. वंडागळी, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी आळंदी परिसरातील खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अकरा वर्षीय पीडित मुलाला वारकरी शिक्षणासाठी आई वडिलांनी पाठवले होते. आरोपी शिवप्रसाद भोकनळ हा मुलांना वारकरी संप्रदायासंदर्भात शिक्षण देत होता. शुक्रवारी (दि.१४) संस्थेतील सर्व मुले हरिपाठ करण्यासाठी चालले होते. तेव्हा, पीडित मुलाला भोकनळने तुझ्याकडे काम आहे असे म्हणून थांबवले. सर्व विद्यार्थी हरिपाठाला गेल्यानंतर त्याला एका खोलीत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. दरम्यान, पीडित मुलाला याची वाच्यता केल्यास तुला बघून घेईल अशी धमकी देखील. त्यानंतर पीडित मुलाच्या घरी पाहुणे आल्याने त्याला आईने घरी आणले होते. तेव्हा, भोकनळ यांनी पीडित मुलाला तातडीने परत संस्थेत पाठवावे असे सांगितले. यावरून पीडित मुलगा संस्थेत जायचे नाही म्हणून रडायला लागला. आईने मुलाला विश्वासात घेऊन माहिती विचारली असता मुलाने आईला घडलेला किस्सा सांगितला, त्यावेळी आईच्या पायाखालची जमीन सरकली. याप्रकरणी आळंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवप्रसाद रामनाथ भोकनळ याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.