कर्हा नदीपात्रात बेसुमार वाळूउपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:09 AM2021-01-14T04:09:20+5:302021-01-14T04:09:20+5:30
वापर करून, गावाबाहेर वाळूची वाहतूक करीत आहेत. त्यामुळे गावठाणअंतर्गत नुकत्याच झालेल्या नवीन रस्त्यांचीही यामुळे खराबी होत आहे. गावात बेकायदेशीर ...
वापर करून, गावाबाहेर वाळूची वाहतूक करीत आहेत. त्यामुळे गावठाणअंतर्गत नुकत्याच झालेल्या नवीन रस्त्यांचीही यामुळे खराबी होत आहे. गावात
बेकायदेशीर वाळूउपसा होत असल्याबाबत गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. मात्र, महसूल, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन या बेकायदेशीर वाळूउपशाकडे का दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.
खासगी क्षेत्रातील वाळू मालकी कोणाची... कहा नदी
पात्रालगत अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून शेती तयार केली आहे.
त्या ठिकाणी ते आपला मालकी हक्क समजून वाळूउपसा करीत आहेत, तसेच गुणवडी,
डोर्लेवाडी, झारगडवाडी येथील नदी पात्रालगत असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी
आपल्या खासगी क्षेत्रातील वाळू मोठ्या प्रमाणात काढून विक्री सुरू केली
आहे, याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसल्याने, ही जमिनीखाली निघणारी
वाळू नक्की कोणाच्या मालकीची याबाबतही नागरिकांच्या मनात संभ्रम होत असताना, महसूल व पोलीस
प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त
केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळूमाफियांची दिवसेंदिवस लूट सुरूच
आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.