मतदार यादीत अदलाबदल

By admin | Published: February 16, 2017 03:38 AM2017-02-16T03:38:39+5:302017-02-16T03:38:39+5:30

महापालिका निवडणूक विभागाच्यावतीने मंगळवारी बूथनिहाय मतदार यादी जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी मतदारांच्या अदलाबदली

Exchange in voter list | मतदार यादीत अदलाबदल

मतदार यादीत अदलाबदल

Next

पुणे : महापालिका निवडणूक विभागाच्यावतीने मंगळवारी बूथनिहाय मतदार यादी जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी मतदारांच्या अदलाबदली झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींची पडताळणी करण्याचे काम निवडणूक विभागाकडून सुरू आहे.
महापालिकेच्यावतीने ४१ प्रभागांमधील ३ हजार ४४२ मतदान केंद्रनिहाय मतदारांची यादी मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर केली. त्यामध्ये अनेक ठिकाणी मतदारांच्या नावांची अदलाबदल झाली असल्याचे लक्षात आले. भाजपाचे गटनेते गणेश बीडकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास दांगट यांनी बुधवारी सावरकर भवन येथील निवडणूक कार्यालयामध्ये धाव घेतली. ज्या मतदारांच्या नावांबाबत गोंधळ झाला आहे, त्याची यादी निवडणूक विभागाकडे देण्यात आले. शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी अशाप्रकारे गोंधळ झाला आहे.
मतदारयादीची जबाबदारी देण्यात आलेले सुहास मापारी यांनी याबाबत सांगितले, ‘‘मतदार यादीतील गोंधळाबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्याची सहायक पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरू आहे.’’
निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे, त्यामध्ये आता बदल होऊ शकणार नाही. मात्र, मतदान केंद्रांमध्ये बदल झाला असल्यास त्याबाबत निर्णय घेता येऊ शकेल.’’
महापालिकेच्या ४१ प्रभागनिहाय मतदारांची प्रारूप मतदार यादी १२ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यावर १७ जानेवारीपर्यंत हरकती व तक्रारी
नोंदविण्याचे आवाहन करण्यात
आले होते.
त्यानुसार ९०९ तक्रारी निवडणूक विभागांकडे दाखल झाल्या होत्या. त्यानुसार मतदार यादीमध्ये बदल करण्यात आले होते. मात्र, तरीही अनेक प्रभागातील मतदारांची अदलाबदल कायम राहिली असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Exchange in voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.