राजर्षी शाह सहकारी बँकेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:15 AM2021-03-04T04:15:25+5:302021-03-04T04:15:25+5:30

या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष सुधाकरराव पन्हाळे यांनी सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या अहवाल वृत्तांताचे वाचन केले. डिसेंबर २०२० ...

Excitement of 37th Annual General Meeting of Rajarshi Shah Sahakari Bank | राजर्षी शाह सहकारी बँकेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

राजर्षी शाह सहकारी बँकेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

googlenewsNext

या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष सुधाकरराव पन्हाळे यांनी सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या अहवाल वृत्तांताचे वाचन केले. डिसेंबर २०२० अखेरच्या बँकेच्या एकूण ठेवी रु. ८३७ कोटींच्या असून, रु. ५८० कोटींचे कर्जवाटप केले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय रू.१,४१७ कोटींचा झाला आहे. बँकेचे ग्रॉस एनपीएचे प्रमाण ५.११% असून, नेट एनपीओचे प्रमाण ०% आहे. तसेच बँकेचे स्टॅन्डर्ड कर्जाचे प्रमाण ९४.८९% आहे. दि. ३१ मार्च २०२० अखेर बँकेस ग्रॉस नफा रू. ३३ कोटी ५१ लाख झाला असून, त्यामधून आयकर व इतर केलेल्या आवश्यक तरतुदी रू.२४ कोटी ३५ लाख वजा जाता बँकेला निव्वळ नफा रू. ९ कोटी १६ लाख झालेला आहे.

सदर सभेस उपस्थित असलेल्या बहुतांश सभासदांनी बँकेच्या चांगल्या कामकाजाबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन केले, तसेच बँक प्रशासनाचे कौतुक केले.

सभेस आलेल्या सर्व मान्यवरांचे व सभासदांचे स्वागत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश लक्ष्मण पासलकर यांनी स्वागत केले. बँकेच्या संचालिका कमल व्यवहारे यांनी आभार मानले. सभेचे सूत्रसंचालन रमेश सुतार यांनी केले.

Web Title: Excitement of 37th Annual General Meeting of Rajarshi Shah Sahakari Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.