पालखी सोहळ्याने शाळांमध्ये उत्साह

By admin | Published: July 2, 2017 02:35 AM2017-07-02T02:35:03+5:302017-07-02T02:35:03+5:30

पिंपळे सौदागर येथील हभप पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त ग्रंथ दिंडी व वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते

Excitement among schools in Palkhi culture | पालखी सोहळ्याने शाळांमध्ये उत्साह

पालखी सोहळ्याने शाळांमध्ये उत्साह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रहाटणी : पिंपळे सौदागर येथील हभप पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त ग्रंथ दिंडी व वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्व विद्यार्थी वारकऱ्यांचा वेश परिधान करून दिंडीमध्ये ग्यानबा तुकारामचा जयघोष व ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामचा जयघोष विविध अभंग म्हणत हरिनामाचा जयजयकार करीत दिंडीत मोठ्या उत्साहाने विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेच्या प्रांगणात रिंगणाचा सोहळा पार पडला. विठू नामाचा गजर करीत विद्यार्थी भक्ती सागरात नाहून गेले होते़
अनेक विद्यार्थिनीनी डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन विठू नामाचा जयजयकार करीत तर विद्यार्थी गळ्यात टाळ आडकून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम म्हणत दिंडीत सहभागी झाले होते. तसेच पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश देत झाडे लावा झाडे जगवा आशा घोषणा देत होते.
तुकाराम, ज्ञानेश्वर, विठ्ठल, रुक्मिणी, कृष्ण असे अनेक वेगवेगळी वेशभूषा केलेली विद्यार्थी,
विद्यार्थिनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते दिंडी व ग्रंथ पूजन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका दीपाली जुगूळकर, वृंदा भावे, क्रीडा शिक्षक राहुल कोरे यांच्यासह राजकीय, सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच पालक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कन्याशाळेतर्फे विविधांगी दिंडी उपक्रम साजरा
जाधववाडी : साई जीवन प्राथमिक शाळा महापालिका शाळा क्ऱ ८७ कन्याशाळेतर्फे वृक्ष दिंडी, ग्रंथ दिंडी, पर्यावरण दिंडी, पारंपरिक दिंडी असा विविधांगी उपक्रम घेण्यात आला. संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत तुकाराम आदी संतांचा पेहराव चिमुकल्यांनी घालून उपस्थितांना आकर्षित केले. या वेळी हभप तुकाराममहाराज जानगुडे या विद्यार्थ्याने समाज प्रबोधनपर कीर्तन केले. या संपूर्ण दिंडी उपक्रमाची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका लता गायकवाड यांना प्रथम सूचली त्यांनी आपल्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांच्या सोबतीने हा विविधांगी उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांना नव्या दिशा मिळण्याकरिता असे उपक्रम अधूनमधून होणे गरजेचे आहेत, असे गायकवाड म्हणाल्या. शशिकांत गायकवाड, विभीषण फलफले, जयमाला गावडे, जयश्री पाटील, उज्ज्वला मरळे, सुनंदा नाडेकर, मंगेश भोंडवे, विलास अंभेरे, मुक्ता सूर्यवंशी, रूपाली सोनवणे, गोरक्षनाथ भांगरे, सुदाम केंगल, श्रीकृष्ण केंगले, पुष्पा मोरे, सारिका राऊत या सर्व शिक्षकांनी दिंडीकरिता विशेष असे परिश्रम घेतले.या प्रसंगी नगरसेविका अश्विनी जाधव व नगरसेवक राहुल जाधव उपस्थित होते़

Web Title: Excitement among schools in Palkhi culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.