दिवसभर उत्साह आणि दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:11 AM2021-01-17T04:11:11+5:302021-01-17T04:11:11+5:30
वेळ - १२.०० हडपसर : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला नोबल हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळी बारा वाजल्यापासून सुरुवात झाली. डॉ. आशुतोष ...
वेळ - १२.००
हडपसर : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला नोबल हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळी बारा वाजल्यापासून सुरुवात झाली. डॉ. आशुतोष शेलार (वय ३५, रा. काळेपडळ ) यांना सर्वप्रथम, तर शहाजी चंद्रकांत हरपळे (वय ३५, रा.फुरसुंगी) या वैद्यकीय कमाचारी यांना लस देण्यात आली. सकाळी महापालिकेच्या अण्णासाहेब मगर रुग्णालयातून लस आणण्यात आली. पोलिस कर्मचारी तसेच महापालिकेचे अधिकारी येथे उपस्थित होते. दिवसभरात हर्षाली मासाळ व शामली केसाळ या दोन्ही परिचारीकांनी लसीकरण केले.
लसीकरण केंद्राचे उदघाटन मगरपट्टा सिटीचे मँनेजिंग डायरेक्टर सतीश मगर, आमदार चेतन तुपे, नोबल हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.दिलीप माने, डॉ.मंगेश लिंगायत, डॉ.एम.बी.आबनावे, डॉ.खान, डॉ.राज कोद्रे, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश भेंडे, सहायक आयुक्त सोमनाथ बनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल काळे यांसह अनेक नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.
---------------------
कोरोना काळात आम्ही काळजी घेऊन काम केले. त्यामुळे आम्हाला भिती वाटत नाही. आता लस घेऊन पुन्हा जोमाने काम करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहे.
-डॉ. आशुतोष शेलार
--------------------
लसीची उत्सुकता होती; मात्र लस घेण्याबाबत मनात कोणतीही भिती नव्हती. कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे होते. लस घेतल्यावर कोणताही त्रास झाला नाही, काही वेगळे वाटले नाही. अधिकाधिक लोकांनी या लसीकरणाचा फायदा घेणे गरजेचे आहे.
- शहाजी चंद्रकांत हरपळे