शारदा बालक विहार प्रशालेच्या स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:17 AM2021-02-18T04:17:33+5:302021-02-18T04:17:33+5:30

पुणे : शरयू आपटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्या महामंडळ संचलित शारदा बालक विहार प्रशालेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पूर्वप्राथमिक शिक्षकांसाठी ...

In the excitement of Sarada Balak Vihar School competition | शारदा बालक विहार प्रशालेच्या स्पर्धा उत्साहात

शारदा बालक विहार प्रशालेच्या स्पर्धा उत्साहात

Next

पुणे : शरयू आपटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्या महामंडळ संचलित शारदा बालक विहार प्रशालेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पूर्वप्राथमिक शिक्षकांसाठी बाल अभिनय, गीतगायन स्पर्धा, बालकथा लेखनस्पर्धा झाल्या. या वेळी आदर्श शिक्षिका पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.

मुख्याध्यापिका शीतल पवार यांनी ही माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष अभय आपटे, ज्येष्ठ कवी हिमांशू कुळकर्णी, अ. ल. देशमुख, जयप्रकाश कुटे पाटील, रोहन आपटे, गीता देडगावकर, अपर्णा कुलकर्णी, प्राची पेंडसे आदी या वेळी उपस्थित होते. ऋचा कर्वे, सुलक्षणा समुद्रे, कौमुदी सवाई, माधवी येल्लारपुरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

छाया दीक्षित यांना आपटे यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाल अभिनय गीतगायन स्पर्धेची शरयू आपटे फिरती ढाल माधवी कुलकर्णी यांनी पटकाविली. बालकथा लेखनस्पर्धेची ढाल धनश्री पाटील, राजश्री अवचट यांनी, तर स्वरचित गीताची ढाल श्रद्धा कुलकर्णी यांनी मिळवली. शालांतर्गत बाल अभियान गीत स्पर्धेत रेखा चोरगे पहिल्या आल्या.

----------

क्रांतीसूर्य लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

पुणे : क्रांतीसूर्य लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक भगवान वैराट यांनी समाधीचे पूजन केले. यावेळी राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी केली. सुरेखा भालेराव, वैशाली अवघडे, सुनील भिसे, अर्चना वाघमारे, वंदना पवार, बाबासाहेब सुतार, नारायण कांबळे, सुरेखा भोसले, नारायण खंडागळे, गणेश खंडाळे आदी उपस्थित होते.

Web Title: In the excitement of Sarada Balak Vihar School competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.