सुप्यात शिष्यवृत्ती परीक्षा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:13 AM2021-08-15T04:13:48+5:302021-08-15T04:13:48+5:30
सुपे परीक्षा केंद्रामध्ये परिसरातील श्री शहाजी विद्यालय सुपे, इंग्लिश मीडियम सुपे, काऱ्हाटी, कारखेल, नारोळी आदी पाच शाळांचे विद्यार्थी उपस्थित ...
सुपे परीक्षा केंद्रामध्ये परिसरातील श्री शहाजी विद्यालय सुपे, इंग्लिश मीडियम सुपे, काऱ्हाटी, कारखेल, नारोळी आदी पाच शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ५ वी) परीक्षेसाठी प्रविष्ट ६५ विद्यार्थ्यांपैकी ५६ विद्यार्थी, तर माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ८ वी) परीक्षेसाठी प्रविष्ट ७९ विद्यार्थ्यांपैकी ६६ विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती केंद्रसंचालक शरद मचाले (पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा) आणि संपत मासाळ (माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा) यांनी दिली. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षण चालू असताना अशाप्रकारे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रत्यक्ष शाळेत येऊन परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. परीक्षाप्रमुख म्हणून डी. एस. करचे (इ. ५ वी) आणि व्ही. व्ही. कड (इ. ८ वी) यांनी तर पर्यवेक्षक म्हणून आर. बी. दुर्गे, श्रीमती के. जी. वीरकर, ए. ए. पलांडे, एस. आर. धालपे, के. के. पवार, व्ही. एल. लोणकर यांनी काम पाहिले. परीक्षा कालावधीमध्ये देऊळगाव रसाळचे केंद्रप्रमुख एच.जे.चव्हाण यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन परीक्षेची पाहणी करून उत्कृष्ट नियोजनाबद्दल सर्वांचे कौतुक केले.
कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून सर्वांच्या सहकार्याने उत्साहाच्या वातावरणामध्ये परीक्षा पार पडली.