पुणे शहरात याेग दिनाचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 02:33 PM2019-06-21T14:33:14+5:302019-06-21T14:34:19+5:30
पुणे शहरात याेग दिन उत्साहात साजरा करण्यात आला
पुणे : जागतिक याेग दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. शहरातील सर्वच शाळांमध्ये याेगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अभिनव इंग्लिश मिडियम स्कूलच्या 4 हजार 200 विद्यार्थ्यांनी याेगा केला. तसेच पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा याेगा केला.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे दोन हजारहून अधिक विद्यार्थी - विद्यार्थिनीनी फंक्शन ग्राऊंड (आझम कॅम्पस) येथे योग प्रात्यक्षिके सादर केली . एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार , 'आझम स्पोर्ट्स अकादमी'चे संचालक गुलझार शेख ,प्राध्यापक ,शिक्षक वर्ग इत्यादी उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त शि. प्र. मंडळी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशनचे (विकासा) आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमात जवळपास ३००० विद्यार्थी, शिक्षक व सीए इन्स्टिट्यूट सहभागी झाले होते. यावेळी शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षा ऋता चितळे, उपाध्यक्ष अभिषेक धामणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
भावे हायस्कूल मध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी दरवर्षी भावे हायस्कूल मध्ये हा दिवस साजरा करण्यात येतो. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ यांनी २१ जून लाच योग का करतात याची वैज्ञानिक आणि पारंपरिक माहिती सांगितली. यामध्ये शाळेच्या ३०० विद्यार्थी व शिक्षकांनी भाग घेतला. पतंजली योगपीठाचे श्री भडाळे, शशी भाटे यांनी यागाचे विविध प्रकार, प्राणायाम याची प्रात्याक्षिके विद्यार्थ्यांकडून करवून घेतली व त्याची शास्त्रोक्त माहिती सांगितली.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सर्वप्रथम 2015 साली राजपथावर 21 जून राेजी याेगदिन साजरा केला. भारत सरकारच्या प्रयत्नामुळे 21 जून हा जागतिक याेगदिन म्हणून साजरा केला जाताे. भारताबराेबरच जगभरात हा दिवस उत्साहात साजरा केला जाताे.