खळबळजनक ! घरचे मोबाइल घेऊन देत नाही म्हणून नववीतील मुलाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 07:39 PM2021-02-27T19:39:09+5:302021-02-27T19:39:47+5:30

आदित्य आई-वडील व आजीकडे मोबाईल घेऊन देण्यासाठी आग्रह करत होता. मात्र, ते मोबाइल घेऊन देण्यास नकार देत होते.

Exciting! Ninth standred student commits suicide as he does not take home mobile phone | खळबळजनक ! घरचे मोबाइल घेऊन देत नाही म्हणून नववीतील मुलाची आत्महत्या

खळबळजनक ! घरचे मोबाइल घेऊन देत नाही म्हणून नववीतील मुलाची आत्महत्या

Next

वाल्हे: येथील सिध्दार्थ नगर शेजारील दोडके वस्ती मधील एका नववीत शिकणाऱ्या मुलाने घरचे मोबाईल घेऊन देत नाही म्हणून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. 

आदित्य रविद्र दोडके (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य, आई वडील व आजीकडे मोबाईल घेऊन देण्यासाठी आग्रह करत होता. मात्र, ते मोबाइल घेऊन देण्यास नकार देत होते. शनिवारी सकाळी आजीने त्याची समजुत काढत दोन महिन्यांची पेन्शन आली की लाईटबिल भरू आणि तुला मोबाइल विकत घेऊ अशी समजूत काढली. मात्र, रूसलेल्या आदित्यने सकाळीच घरातील एका खोलीचा दरवाजा बंद करुन साडीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 ही घटना वाल्हे पोलिस चौकीतील पोलीस संतोष मदने यांना सांगितल्यावर त्यांनी घटना स्थळी भेट दिली. तसेच आदित्यला खाली काढून जेजुरी येथे दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास जेजुरी पोलिस ठाण्याचे प्रभारी सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस संतोष मदने, संदीप मोकशी व केशव जगताप हे करत आहेत.
 

Web Title: Exciting! Ninth standred student commits suicide as he does not take home mobile phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.