महिला शिक्षकांना कोरोना सर्वेक्षणातून वगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:09 AM2021-05-19T04:09:54+5:302021-05-19T04:09:54+5:30
तालुक्याच्या पूर्व भागातील हॉटस्पॉट असलेली अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, धामणी, पारगाव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व ...
तालुक्याच्या पूर्व भागातील हॉटस्पॉट असलेली अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, धामणी, पारगाव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व महिला शिक्षक दररोज घरोघरी जावून कुटुंबाचे कोरोना सर्वेक्षण करण्याचे काम सकाळी १० ते ४ वेळेत करत आहे. या वेळी सर्वेक्षणात कुटुंबातील व्यक्तींची नावे, मोबाइल नंबर, बीपी डायबेटिस व इतर आजारांची माहिती घेणे, लसीकरणाबाबतची माहिती, घरातील कोरोना संक्रमित व्यक्तींची नावे आदी प्रकारची माहिती घरोघरी जावून शिक्षकांना घ्यावी लगत आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने शिक्षकांचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांबरोबर संपर्क झाल्याने काही शिक्षकांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता व वाढता कोरोनाचा संसर्ग अशा परिस्थितीत शिक्षकांना दोन ते तीन किलोमीटर सर्व्हेक्षणासाठी फिरावे लगत आहे. तरी त्यांना कुटुंबाच्या आरोग्याची काळजी भेडसावत असल्याने काही काळ तरी त्यांना विश्रांती मिळावी, अशी मागणी शिक्षक वर्गाकडून होत आहे.
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शिक्षकांना कडक उन्हात घरोघरी जावून कोरोना सर्व्हेक्षण करत पायी फिरावे लागत आहे.