तिहेरी तलाक पद्धती हद्दपार करा : शायरा बानो; पुण्यात ‘तिहेरी तलाक नाट्य की असंतोष’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:52 PM2018-01-23T12:52:36+5:302018-01-23T12:58:44+5:30
अनेक मुस्लिमबहुल देशात कालबाह्य अशी तिहेरी तलाक पद्धत रद्द झालेली आहे. अन्याय करणारी दृष्ट समाजिक प्रथा हद्दपार करून समाजाचे नवनिर्माण करण्याची गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या व तिहेरी तलाकच्या याचिकाकर्त्या शायरा बानो यांनी केले.
पुणे : अनेक मुस्लिमबहुल देशात कालबाह्य अशी तिहेरी तलाक पद्धत रद्द झालेली आहे. अन्याय करणारी दृष्ट समाजिक प्रथा हद्दपार करून समाजाचे नवनिर्माण करण्याची गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या व तिहेरी तलाकच्या याचिकाकर्त्या शायरा बानो यांनी केले.
एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट, एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या भारतीय छात्र संसदेच्या ‘तिहेरी तलाक नाट्य की असंतोष’ या विषयावर शायरा बानो बोलत होत्या.
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, मुख्य इमाम डॉ. इमाम उमर अहमद इल्यासी, डॉ. मौलाना सय्यद कल्बे रशीद रिझवी, डॉ. विश्वनाथ कराड, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक राहुल कराड आदी उपस्थित होते.