Exclusive: आम्ही निकालाआधीच ठरवलं होतं; संजय राऊतांनी सांगितलं सरकार स्थापनेमागचं 'प्लॅनिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 01:54 PM2020-01-15T13:54:27+5:302020-01-15T14:17:26+5:30

महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं सगळ्यात आधी पवारांनी ठरवलं.

Exclusive: Sanjay Raut says that 'planning' after the establishment of government | Exclusive: आम्ही निकालाआधीच ठरवलं होतं; संजय राऊतांनी सांगितलं सरकार स्थापनेमागचं 'प्लॅनिंग'

Exclusive: आम्ही निकालाआधीच ठरवलं होतं; संजय राऊतांनी सांगितलं सरकार स्थापनेमागचं 'प्लॅनिंग'

googlenewsNext
ठळक मुद्दे कुणी कुणाच्या कचाट्यात नाही. तीन पक्षांची गरज आहे.महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं सगळ्यात आधी पवारांनी ठरवलं. हे काय टेस्ट ट्युब बेबी नसून बाळ व्यवस्थित जन्माला आलेलं आहे.

पुणेः कुणी कुणाच्या कचाट्यात नाही. तीन पक्षांची गरज आहे, महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं सगळ्यात आधी पवारांनी ठरवलं. हे काय टेस्ट ट्युब बेबी नसून बाळ व्यवस्थित जन्माला आलेलं आहे. त्याला पाळण्यात ठेवलंय अन् बारसंही झालंय, आता त्याचा वाढदिवस होईल, असं म्हणत संजय राऊतांनी महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार म्हणणाऱ्यांना जोरदार चपराक लगावली आहे. लोकमत पत्रकार पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते.
  
ते शब्द पाळणार नाहीत याची मला खात्री होती. माझं ते माझं, तुझं ते माझ्या बापाचं असंच त्यांनी ठरवलं होतं.  विधानसभेच्या जागावाटपासंबंधांत काही गोष्टी घडत गेल्या. हे नंतर गडबड करणार लक्षात आलं होतं, पण हे चक्र फिरत राहिलं. त्यातून हे सरकार निर्माण झाल्याचा खुलासाही संजय राऊतांनी केला आहे.  शरद पवारांवर प्रचंड विश्वास आणि श्रद्धा आहे, ठाकरे, पवार यांचा जनमानसावर प्रचंड प्रभाव-पगडा आहे, हेच सरकार परिवर्तन घडवू शकतं. या सरकारला कुणी खिचडी सरकार म्हणत नाही, तर लोक सरकार म्हणताहेत. पुलोदची खिचडी म्हणत होते. या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे करताहेत आणि सरकारच्या पाठीशी शरद पवार ठामपणे उभे आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 
आमच्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे धक्कादायक नव्हते. पहिल्या दिवसापासून आमचं ठरलं होतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हावं. मी सातत्यानं सांगितलं की, आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील. आमच्यासाठी मुख्यमंत्री कोण हा प्रश्न नव्हता. ताजच्या 11 तारखेच्या बैठकीला उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. अजित पवार आणि फडणवीस यांनी एकत्र सरकार स्थपन केल्यावर आम्हाला फार काही वाटलं नाही. हा फुसका बार आहे हे माहीत होतं. आमच्या गाडीचं चाक नाही, तर ते आमची स्टेपनी घेऊन गेले होते, असा टोलाही संजय राऊतांनी भाजपाला लगावला. मुख्यमंत्री हा बॉस असतो आणि तो शिवसेनेचा आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाराष्ट्रातल्या मातीतले पक्ष आहे. आम्हाला आकडा कळत नाही, आम्ही आकडा लावला. प्रत्येक खातं राज्यासाठी महत्त्वाचं असतं. गृह राष्ट्रवादीला दिलं हे आमचंच सरकार आहे.


राज्याचा मुख्यमंत्री आमचा आहे, त्यामुळे सर्व खाती आमची आहेत. शिवसेनेनं आपल्याकडे येणारी कुठलीही खाती स्वतःकडे ठेवलेली नाहीत. शरद पवारांनी पहिल्या दिवसापासून सांगितलं की हे सरकार बनवायचं ते टिकवायचे आणि आदर्श सरकार निर्माण करायचे. आज लोकांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. पूर्ण 5 वर्षे सरकार आम्ही चालवणार आहोत. आता मुलाचं बारसं झालंय. पुढच्या 5 वर्षाचं सुद्धा आम्ही प्लॅनिंग करून ठेवलंय. आमची भूमिका ठाम असते. आम्ही करायचं ठरवलंय आणि सरकार चालवणार पडद्या मागच्या गोष्टी पडद्यामागे राहु द्या तर सिनेमा चालू राहील. हे सरकार सुपरहिट सिनेमा आहे. हे सरकार घडवण्यात अनेकांचे सहकार्य आहे. एक कलाकृती घडवताना अनेकांचे योगदान असते. सरकार हा समाजाभिमुख सिनेमा आहे. आम्ही उत्तम कलाकृती निर्माण केली आहे, त्याला तुम्ही हवं ते नाव ठेवा, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

Web Title: Exclusive: Sanjay Raut says that 'planning' after the establishment of government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.