Pune: सहलीच्या बसचा अपघात, शिक्षक जागीच ठार; जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 12:10 PM2023-12-21T12:10:07+5:302023-12-21T12:11:43+5:30
या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाल्याची तर एक शिक्षक व काही विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे....
- तात्याराम पवार
बावडा (पुणे) : इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहलीनिमित्त विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात गुरुवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात झाला. ही घटना माळशिरस-अकलुज रोडवर माळशिरस तालुक्यातील वटपळी पाटीलवस्ती येथे घडली. या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाल्याची तर एक शिक्षक व काही विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अकलुज आगाराची एम एच १४ बी.टी.४७०१ ही बस इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल दि. ( १९ डिसेंबर मंगळवारी) घेऊन गेली होती. ती बस परतीच्या प्रवासा दरम्यान आज पहाटे बस आणि टेम्पो मध्ये अपघात झाला.
या अपघातामध्ये बाळकृष्ण हरिभाऊ काळे (वय ५३) या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर रमाकांत शिवदास शिरसाट या शिक्षकासह काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. सदर जखमींना १०८ सेवेच्या रुग्णवाहिकेतून अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा उपचारासाठी दाखल करण्यात आले.