थकीत एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 AM2021-05-23T04:09:03+5:302021-05-23T04:09:03+5:30

बारामती : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सभासदांना ४०० रुपये प्रतिटन थकीत एफआरपी व्याजासह तातडीने ...

Exhausted FRP | थकीत एफआरपी

थकीत एफआरपी

Next

बारामती : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सभासदांना ४०० रुपये प्रतिटन थकीत एफआरपी व्याजासह तातडीने द्यावी; अन्यथा कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामे द्यावेत, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे सदस्य विशाल निंबाळकर यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन कार्यकारी संचालकांना देण्यात आला आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक झाली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे एफआरपीचे थकीत ४०० रुपये शेतकऱ्यांना आठ दिवसांत जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. कायद्याप्रमाणे ही रक्कम १४ दिवसांमध्ये देणे बंधनकारक असलेली रक्कम अजूनही दिली गेली नाही. यामुळे आता या रकमेचे व्याजही देण्याबाबत तरतूददेखील कायद्यात आहे, असे निंबाळकर यांनी या निवेदनात म्हटले आहे. तसेच संचालक मंडळाची मुदत संपली आहे. यामुळे संचालक मंडळ हे पैसे देण्यात असमर्थ असेल तर संचालक मंडळाने राजीनामा द्यावा, अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे. तसेच येणाऱ्या काळात ही रक्कम दिली गेली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. आता उसाची शेती शेतकऱ्यांनी कोणाच्या प्रपंचासाठी करायची हे ठरविण्याची वेळ आल्याचे निंबाळकर म्हणाले.

————————————————

फोटोओळी—छत्रपती कारखान्याने थकीत एफआरपी व्याजासह देण्याची मागणी विशाल निंबाळकर यांनी केली आहे.

२२०५२०२१ बारामती—०२

—————————————

शिल्लक बातमी

Web Title: Exhausted FRP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.