पुरस्करप्राप्त पुस्तकांचे प्रदर्शन भरायला हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:28 AM2020-12-12T04:28:10+5:302020-12-12T04:28:10+5:30
राजेंद्र बनहट्टी : साहित्य परिषदेत पुष्पा पुसाळकर पुरस्कार वितरण लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ''''''''आशय हा कोणत्याही पुस्तकाचा आत्मा ...
राजेंद्र बनहट्टी : साहित्य परिषदेत पुष्पा पुसाळकर पुरस्कार वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ''''''''आशय हा कोणत्याही पुस्तकाचा आत्मा असतो, त्याला साजेशी पुस्तकनिर्मिती करणे यात प्रकाशकाची सर्जनशीलता दिसते. उत्तम पुस्तके अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे स्वतंत्र प्रदर्शन असावे. त्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घ्यावा'''''''', अशी अपेक्षा माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेत कै. पुष्पा पुसाळकर पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. ''''''''सह्याद्रीच्या गिरिशिखरावरून'''''''' या डॉ. अमर अडके लिखित ग्रंथाच्या उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीबद्दल हा पुरस्कार अक्षरदालन प्रकाशन कोल्हापूरचे अमेय जोशी याना बनहट्टी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, ग्रंथनिवड समितीच्या सदस्य प्रा. रुपाली अवचरे उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, ''''''''पुस्तक निर्मिती हा सामूहिक आविष्कार आहे. पुस्तक प्रकाशन-प्रक्रियेत लेखकाइतकेच मुद्रितशोधक, चित्रकार, बांधणीकार, छपाई करणारे यांचे योगदान महत्वाचे आहे."
डॉ. अमर अडके यांनी मनोगत व्यक्त केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. कार्यवाह बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.