एसटीचे अंतरंग उलगडून दाखविणारे "वारी लालपरीची" फिरते प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 09:02 PM2019-07-03T21:02:57+5:302019-07-03T21:06:28+5:30

एसटीचे अंतरंग उलगडून दाखविणारे वारी लालपरीची हे फिरते प्रदर्शन सध्या पुणे दाैऱ्यावर आहे.

the exhibition that showcase the greatness of ST bus | एसटीचे अंतरंग उलगडून दाखविणारे "वारी लालपरीची" फिरते प्रदर्शन

एसटीचे अंतरंग उलगडून दाखविणारे "वारी लालपरीची" फिरते प्रदर्शन

Next

पुणे : एसटीचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळेच महत्त्व आहे. एसटी प्रवासाच्या आठवणी नागरिक मनात साठवून ठेवत असतात. 1948 साली सुरु झालेल्या एसटीमध्ये काळानुरुप अनेक बदल हाेत गेले. गेल्या पाच वर्षात यात आणखीनच भर पडली. एसटीचे अंतरगं उलगडून दाखविणारे वारी लालपरीची हे फिरते प्रदर्शन सध्या पुणे दाैऱ्यावर आहे. एका जुन्या एसटीमध्येच हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आज हे फिरते प्रदर्शन स्वारगेट भागात हाेते. उद्या (गुरुवारी) हे प्रदर्शन शिवाजीनगर स्थानकात असणार आहे. 

बस फाॅर अस फाऊंडेशनची या प्रदर्शनामागील कल्पना आहे. एका एसटीच्या जुन्या बसमध्ये सुधारणा करुन आकर्षक मांडणी करत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये एसटीच्या विविध प्रतिकृती, तसेच एसटीचा 1948 पर्यंतचा प्रवास उलगडून दाखविण्यात आला आहे. त्याचबराेबर एसटी महामंडळाच्या विविध याेजनांची देखील यात माहिती देण्यात आली आहे. लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी काळासाेबत बदलत अत्याधुनिक तसेच वातानुकुलित झाली आहे. या बदललेल्या स्वरुपाचा देखील या प्रदर्शनात आढावा घेण्यात आला आहे. त्याचबराेबर बसची बांधणी नेमकी कशा पद्धतीची असते याची माहिती देखील देण्यात आली आहे. त्याचबराेबर या प्रदर्शनात लक्ष वेधून घेणारा फलक म्हणजे माझी काय चुक हाेती असे म्हणणारा फलक. कुठलेही आंदाेलन झाले की आंदाेलकांकडून एसटीला लक्ष केले जाते. एसटीची जाळपाेळ करण्याच्या अनेक घटना एसटीच्या इतिहासात घडल्या आहेत. त्यामुळे या फलकाच्या माध्यमातून एक प्रकारे एसटीेचे मनाेगतच व्यक्त करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनाबाबत बाेलताना बस फाॅर अस फाऊंडेशनचा राेहित धेंडे म्हणाला, एका जुन्या एसटीमध्ये बदल करुन ही प्रदर्शनाची एसटी तयार करण्यात आली आहे. एसटीच्या प्रदर्शनाची बस तयार व्हावी अशी आमची एसटी प्रेमींची इच्छा हाेती. एसटी महामंडळ आणि आम्ही संयुक्तपणे हा उपक्रम राबवित आहाेत.एसटीची महती लाेकांपर्यंत पाेहचविण्यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हा प्रदर्शन रथ आषाढीच्या वारीत देखील घेऊन जाणार आहाेत. 

Web Title: the exhibition that showcase the greatness of ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.