वेश्याव्यवसायातून परदेशी तरुणींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 02:47 AM2018-08-26T02:47:15+5:302018-08-26T02:47:41+5:30
वैद्यकीय व्हिसावर आलेल्या दोघा परदेशी तरुणींच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार कोंढवा पोलिसांनी उघडकीस आणला आहे़
पुणे : वैद्यकीय व्हिसावर आलेल्या दोघा परदेशी तरुणींच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार कोंढवा पोलिसांनी उघडकीस आणला आहे़ पैशासाठी त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की कोंढव्यातील शालिमार इमारतीत परदेशी मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तोगे यांना समजली़ त्यांनी ही बाब गुन्हे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांना कळविली़ कुंभार यांनी शुक्रवारी एक पथक तयार केले़ बनावट गिºहाईकाला संबंधित मोबाईलवर फोन करायला सांगून वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविल्या जात असल्याची खात्री केली़ त्यानंतर त्यांना शालिमार इमारतीत पाठविण्यात आले़ बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी तेथील फ्लॅटवर पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, सहायक फौजदार देशमुख, हवालदार तोगे, नाईक, थोरात, गावडे, मुकाडे, कोळेकर यांनी छापा टाकला़
या फ्लॅटमध्ये दोन युगांडा येथील महिला आढळून आल्या़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी आपण ६ महिन्यांपूर्वी वैद्यकीय व्हिसावर भारतात आले आहोत़ औषधोपचारासाठी पैशाची आवश्यकता असल्याने त्यांना वेश्याव्यवसायातून चांगले पैसे मिळू शकतील, असे सांगून आमच्याकडून तो वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे सांगितले़ पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे़