परकिय ड्रॅगन फळाचे उत्पादन महाराष्ट्रात जोरात; दरात दुप्पट वाढ

By अजित घस्ते | Published: September 17, 2023 05:52 PM2023-09-17T17:52:57+5:302023-09-17T17:53:09+5:30

ड्रॅगन फ्रुटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर्स आणि व्हिटॅमिन सी आढळतात

Exotic dragon fruit production booms in Maharashtra; Doubling the rate | परकिय ड्रॅगन फळाचे उत्पादन महाराष्ट्रात जोरात; दरात दुप्पट वाढ

परकिय ड्रॅगन फळाचे उत्पादन महाराष्ट्रात जोरात; दरात दुप्पट वाढ

googlenewsNext

पुणे : परदेशी मातीतील ड्रॅगन फ्रूट मूळचे थायलंड आणि चीनमधील आहे. मात्र भारतीय बाजारपेठेतून या फळाला वाढती मागणी विचारात घेऊन महाराष्ट्रातील स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्याकडे या फळाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. यामध्ये बारामती, फलटण, नगर, सोलापूर, सातारा,सांगली याभागातील शेतकरी मोठया प्रमाणात या फळाची लागवड करत आहेत. फळांना मागणी मोठी असून दरही चांगला मिळत आहे.

सध्या या फळाला अधिक मागणी आहे. मात्र सध्या पावसामुळे ड्रॅगन फळांची आवक घटली असून दरात दुप्पट भाव झाली आहे. गणेशोत्वसात ड्रॅगन फ्रूट, किवी,सफरचंद आदी फळांना बाजारपेठेत मागणी आहे.

मार्केटयार्डातील फळबाजारात पुर्वी दररोज पाच ते दहा टन आवक होती. प्रतवारीनुसार ड्रॅगन फळाचे दर ३० ते १५० रुपये भाव होता मात्र सध्या आवक घटल्याने घाऊक बाजारात १०० ते १८० रूपये किलोचा भाव असून किरकोळ भावात २५० रूपये किलो भाव खाल्ला आहे.भावात दुप्पट वाढ झाली आहे.चार-पाच वर्षांपूर्वी भारतात ड्रॅगन फ्रूटच्या आयातीला सुरुवात झाली. यंदा मात्र पावसाअभावी पिकांचे उत्पादन घटले आहे. बाजारात साधारण २ टन आवक होत असून उत्पादन घटले आहे.मात्र मागणी अधिक असल्याचे व्यापारी पाडूरंग सुपेकर यांनी सांगितले.

-ड्रॅगन फळांचा हंगाम जून ते नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. नोव्हेंबर महिन्यापर्यंत हंगाम सुरू असतो. यंदा हंगामाच्या पहिल्या टप्यात ड्रॅगन फळांना चांगले दर मिळाले असून गतवर्षीच्या तुलनेत ड्रॅगन फळांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.

डेंगी-मलेरिया यांसारख्या आजारांवर गुणकारी : शहरात सध्या वायरल वाढत असल्याने रोग्यासाठी खूप चांगले असते. या फळाचे सेवन केल्यास मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. ड्रॅगन फ्रुटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर्स आणि व्हिटॅमिन सी आढळतात. याफळांचे सेवन केल्यास रक्तातील पेशी वाढतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ड्रॅगन फळांना मागणी वाढत आहे.

Web Title: Exotic dragon fruit production booms in Maharashtra; Doubling the rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.