चाकण तरकारी भाजीपाला बाजाराचे विस्तारीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:10 AM2021-01-17T04:10:51+5:302021-01-17T04:10:51+5:30
या वेळी सभापती विनायक घुमटकर,उपसभापती धारू गवारी,संचालक नवनाथ होले,विलास कतोरे,सुगंधा शिंदे,बाळ ठाकूर,चंद्रकांत इंगवले,सुरेखा टोपे,रमेश राळे,राम गोरे,प्रकाश भुजबळ,मोबिन काझी,संध्या जाधव,कुमार ...
या वेळी सभापती विनायक घुमटकर,उपसभापती धारू गवारी,संचालक नवनाथ होले,विलास कतोरे,सुगंधा शिंदे,बाळ ठाकूर,चंद्रकांत इंगवले,सुरेखा टोपे,रमेश राळे,राम गोरे,प्रकाश भुजबळ,मोबिन काझी,संध्या जाधव,कुमार गोरे,संजय वहिले,प्रताप ढमाले,मयूर मोहिते पाटील,कैलास सांडभोर,दीपक हगवणे उपस्थित होते.
शेतीला मुबलक पाणी मिळत असल्याने असंख्य शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात शेतीमाल विक्रीसाठी येत आहे. चाकण बाजारात भाजीपाला खरेदीसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, कर्जत, मुंबई या शहरातून व्यापारी येत आहे.त्यामुळे तरकारी भाजीपाला बाजाराला जागा कमी पडत होती.जागा छोटी असल्याने अडत्यांना शेतकऱ्यांकडून येणारा शेतीमाल विक्रीला ठेवण्यासाठी जागा कमी पडत होती,चाकण आडते असोसिएशनकडून बाजार समितीकडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. बैल बाजार रोहकल रस्त्यावर गेल्याने बाजार समितीच्या आवारात मोठी जागा उपलब्ध झाली होती.या जागेचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. याच जागेवर तरकारी बाजाराचे विस्तारीकरण करण्यात आले. सूत्रसंचालन व्यंकटेश सोरटे यांनी केले तर आभार सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी मानले.
१६ चाकण
भाजीपाला बाजाराचे विस्तारीकरण जागेचे उद्घाटन करताना दिलीप मोहिते-पाटील व इतर.