मेट्रोच्या अहवालास मुदतवाढ
By admin | Published: April 7, 2015 05:45 AM2015-04-07T05:45:50+5:302015-04-07T05:45:50+5:30
वनाज ते रामवाडी या वादग्रस्त मार्गाचा निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समितीचा अंतिम अहवाल सादर करण्याची
पुणे : वनाज ते रामवाडी या वादग्रस्त मार्गाचा निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समितीचा अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत वाढ सोमवारी संपली. मात्र, अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांचा अभिप्राय अद्याप प्राप्त न झाल्यामुळे समितीचा अहवाल सादर करण्यास एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
शहराच्या मेट्रो प्रकल्पातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट प्रकल्पास ७ मार्च रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, मेट्रो प्रकल्पातील वनाज ते रामवाडी या दुसऱ्या टप्प्यातील वादग्रस्त मार्गावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली स्वंयसेवी संस्थांचे प्रातिनिधी व तज्ज्ञांची समिती नेमली होती. ७ एप्रिलपूर्वी अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले होते.
समितीतील अर्थ तज्ज्ञ विजय केळकर हे मागील काही दिवस बाहेरगावी होते. त्यामुळे त्यांचा अभिप्राय अद्याप मिळाला नसल्याने समितीचा अंतिम अहवाल सादर करण्यास एक आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे, असे पालकमंत्री बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)