सोमेश्वरच्या विस्तारीकरण,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:08 AM2021-03-30T04:08:34+5:302021-03-30T04:08:34+5:30

कारखान्याची ऑनलाइन सभा सोमेश्वरनगर: येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ७५ कोटी ६५ लाख या विस्तारीकरण व ८५ कोटी ...

Expansion of Someshwar, | सोमेश्वरच्या विस्तारीकरण,

सोमेश्वरच्या विस्तारीकरण,

Next

कारखान्याची ऑनलाइन सभा

सोमेश्वरनगर: येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ७५ कोटी ६५ लाख या विस्तारीकरण व ८५ कोटी १२ या सहवीजनिर्मिती प्रकल्पास सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी दिली. यामुळे आता सोमेश्वर कारखान्याचा अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटणार आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या मुख्य कार्यालयात सोमवारी (दि. २९) अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याची ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण पार पडली. कोरोना पार्श्वभूमीवर सभा ऑनलाइन असूनही तब्बल पाच तास विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यात सर्व विषयांना मंजुरी देत सभा खेळीमेळीत पार पडली. सभासदांकडून आलेल्या प्रत्येक प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी विस्तारीकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. विषयपत्रिकेचे वाचन कार्यालयीन अधिक्षक कालिदास निकम यांनी केले. या वेळी उपाध्यक्ष शैलेश रासकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक मंडळ, सर्व अधिकारी उपस्थित होते.

सभेत शहाजी काकडे यांनी कारखान्यावर अतिरिक्त उसाचे संकट आहे, विस्तारीकरण मूलभूत गरज आहे. परतीच्या ठेवींवर १२ टक्के व्याज देण्याची मागणी त्यांनी केली. मदन काकडे यांनी अहवालात साखर मूल्यांकन कमी दिसत असल्याने त्याचा परिणाम ऊस दरावर दिसत आहे. तसेच मशिनरी देखभाल व दुरुस्ती खर्चात तब्बल ९ कोटी २८ लाख खर्च जादा दिसत आहे. तसेच अहवाल पान नंबर २५ वर कारखान्यावर एकूण १८८ कोटी कर्ज दिसत आहे. त्याच बरोबर २०१९-२० चा साखर उतारा पडण्याचं काय कारण असे प्रश्न उपस्थित केले. भाजपचे दिलीप खैरे यांनी उसाच्या रसापासून इथेनॉल बनवण्याची सूचना करून विस्तारीकरणाबाबत करखान्याकडे डीपीआर नसल्याचे समजत आहे. असा सवाल उपस्थित केला.

पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, चालू हंगामात सोमेश्वरने ९ लाख ३१ हजार उसाचे गाळप करत १० लाख २५ हजार साखरेचे उत्पन्न घेतले आहे. दीड लाख टन उस इतर कारखान्याला दिला असून अतिरिक्त उसाचे संकट आहे. उर्वरित सर्वच शेतकऱ्यांचे गाळप पूर्ण करणार आहोत. सन २०२१-२२ या हंगामासाठी कारखान्याकडे ३७ हजार ९०९ एकर ऊसाची नोंद झाली असून जवळपास १५ लाख २० एवढ्या ऊसाचे गाळप होणार आहे. शरयू कारखान्याला सोमेश्वरच्या एफआरपीप्रमाणेच करार करून ऊस देण्यात येत असल्याचेही जगताप म्हणाले. सध्या सोमेश्वरकडे १४ लाख क्विंटल साखर शिल्लक असून संपूर्ण गोदामे भरली आहेत. विस्तारीकरणासाठी निधी उभारताना जिल्हा बँकेकडून ७० टक्के कर्ज तर ३० टक्के कर्ज स्वभांडवलातून उभारणार आहोत. कारखान्यावर चालू मध्यम मुदतीचे ५१ कोटी कर्ज असून याचे सर्व हप्ते सुरळीतपणे सुरु आहेत.

------------------

राज्यातील साखर कारखान्यांनी ब्राझील सारखा पॅटर्न राबविणे गरजेचे आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करावे लागणार आहे. फक्त साखरेमुळे बँकाचे कर्ज वाढत आहे. इथेनॉलपासून फायदा होत असल्याने सभासदांना दर वाढवून देता येणार आहे त्यामुळे यापुढील काळात डिस्टलरीसह वीजनिर्मिती प्रकल्प वाढवावे लागतील.

- पुरुषोत्तम जगताप

अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना

येथील सोमेश्वर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आॅनलाइन पार पडली.

२९०३२०२१-बारामती-१८

-----------------------

Web Title: Expansion of Someshwar,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.