विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराचा होणार विस्तार
By admin | Published: May 13, 2014 08:18 PM2014-05-13T20:18:33+5:302014-05-14T02:40:59+5:30
पुणे विद्यापीठातील प्रवेश द्वारचा विस्तार करण्याच्या दिशेने विद्यापीठ प्रशासनातर्फे पाऊल उचलण्यात आले असून प्रत्येक व्यक्तीची ओळख तपासूनच त्याला विद्यापीठात प्रवेश दिला जाणार आहे.
पुणे: पुणे विद्यापीठातील प्रवेश द्वारचा विस्तार करण्याच्या दिशेने विद्यापीठ प्रशासनातर्फे पाऊल उचलण्यात आले असून प्रत्येक व्यक्तीची ओळख तपासूनच त्याला विद्यापीठात प्रवेश दिला जाणार आहे.त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षा यंत्रणेत सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच प्रवेशद्वारासमोरील परिसराचे सुशोभित केला जाणार असल्याचे विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलणार आहे.
विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकाची विद्यापीठाच्या आवारातच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाची ढीसाळ सुरक्षणा समोर आली.त्यामुळे विद्यापीठात काही ठिकाणी सीसीटीही कॅमेरे बसविण्यात आले. मात्र,तरीही विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न सुटणाला नव्हता. त्यामुळे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.अरुण वाळूज यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने सादर केलेला अहवाल विद्यापीठाच्या व्यस्थापन परिषदेत सादर करण्यात आला. तसेच विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था व विद्यापीठातील अंर्तगत वाहतुक व्यवस्था कशी असावी, यासंदर्भात तयार करण्यात आलेले प्रेझेंंटेशन सर्व सदस्यांना दाखविण्यात आले. सर्व सदस्यांनी वाळूंज यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालास मंजूरी दिली.
विद्यापीठ प्रशासनाने समितीच्या अहवालाप्रमाणे काम करण्यास सुरूवात केली आहे.येत्या वर्शभरात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च होणार आहेत. प्रथमत: विद्यापीठाचे प्रवेशद्वार मोठे केले जाणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी आणि बाहेर येण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग तयार करणे शक्य होणार आहे.परिणामी विद्यापीठात दुचाकी,चारचाकी वाहन घेवून प्रवेश करणा-या व्यक्तीची तसेच पायी ये- जा करणा-या व्यक्तींची नोंद प्रवेश द्वाराजवळ बसविल्या जाणा-या सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून ठेवली जाणार आहे. विद्यापीठातील कर्मचारी अधिका-यांना आणि विद्यापीठात राहणा-या व्यक्तींना रेडिओ फ्रिकेव्हेन्सी आयडेन्टिफिकेशन कार्ड (आरफआयडी) दिले जाणार आहे.त्यामुळे विद्यापीठात नेहमी ये- जा करणा-या व्यक्तींना या यंत्रणेचा त्रास होणार नाही.
त्याचप्रमाणे विद्यापीठ काही कामा निमित्त येणा-या व्यक्तीला स्वतंत्र आरएफआयडी दिले जाईल.आयआफआयडी घेवून विद्यापीठात दाखल होणा-या व्यक्तीला ते कार्ड विद्यापीठातून बाहेर पडताना पुन्हा जमा करावे लागेल. त्याच प्रमाणे प्रथमच विद्यापीठात येणा-या व्यक्तीचे छायाचित्रही काढून ठेवले जाईल. विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी या बाबी उपयुक्त ठरणार आहेत. परिणामी विद्यापीठाच्या सुरक्षा यंत्रणेत पुढील वर्षभरात वाढ होणार आहे.