तेराव्या वित्त आयोगाचा निधी खर्चण्यास मुदतवाढ

By admin | Published: September 25, 2015 01:11 AM2015-09-25T01:11:51+5:302015-09-25T01:11:51+5:30

निवडणुकांची आचारसंहिता, पावसाळा यांमुळे तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून घेतलेली मुरुमीकरण, खडीकरण, डांबरीकरण व सिमेंट-काँक्रिटीकरणाची

The expenditure for the 13th Finance Commission expenditure | तेराव्या वित्त आयोगाचा निधी खर्चण्यास मुदतवाढ

तेराव्या वित्त आयोगाचा निधी खर्चण्यास मुदतवाढ

Next

पुणे : निवडणुकांची आचारसंहिता, पावसाळा यांमुळे तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून घेतलेली मुरुमीकरण, खडीकरण, डांबरीकरण व सिमेंट-काँक्रिटीकरणाची कामे अपूर्ण असल्याने शासनाने जिल्हा परिषदांना सप्टेंबरऐवजी डिसेंबरअखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याची मुभा दिली आहे.
याआधी तेराव्या वित्त आयोगातील निधीतून घेतली जाणारी कामे ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश होते. मात्र, मध्यंतरी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका, सुरू असलेला पावसाळा यंमुळे या मुदतीत कामे पूर्ण करणे शक्य झालेले नाही. बांधकामाची कामे विशेषत: मुरुमीकरण, खडीकरण, डांबरीकरण व सिमेंट-काँक्रिटीकरण ही कामे पावसाळा असल्याने रखडली आहेत.
ज्या जिल्हा परिषदांना ही कामे पूर्ण करता आली नाहीत, त्यांनी डिसेंबरअखेरपर्यंत ती पूर्ण करावीत. त्यानंतर मात्र अखर्चित निधी खर्चण्यास मुदतवाढ देता येणार नाही, असे ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांंनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या संस्थांना जनरल बेसिक ग्रँट, जनरल परफॉर्मन्स ग्रँट, स्पेशल
एरिया बेसिक ग्रँट व परफॉर्मन्स ग्रँटच्या या स्वरूपात तेराव्या वित्त आयोगाचा निधी मिळालेला आहे. आजपर्यंत अखर्चित रक्कम व त्यावरील व्याजाची खर्च न झालेली रक्कम आता तीन महिन्यांत ३१ डिसेंबरपर्यंत खर्च करणे शक्य होणार आहे.

Web Title: The expenditure for the 13th Finance Commission expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.