अन्वीच्या उपचारासाठी 18 कोटींचा खर्च, रोहित पवारांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 08:09 PM2021-08-03T20:09:24+5:302021-08-03T20:12:28+5:30
पिपरीतील एका चिमुकलीवरही अशाच महागड्या उपाचाराची गरज आहे. तिच्यासाठीही मदतीची अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
पुणे - तीरा कामत या मुलीच्या दुर्मिळ आजारावर उपचार यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातील वेदिका शिंदे, ह्या पुण्यातल्या 11 महिन्यांच्या मुलीला एसएमए प्रकार-1 असल्याचे निदान झाले. हा एक दुर्मिळ जेनेटीक आजार असून 2 वर्षांच्या आधीच शिशुचे प्राण जाऊ शकतात. वेदिकाच्या आई-वडिलांच्या प्रयत्नांना, समाजिक पाठिंब्यालाही यश मिळालं. अखेर, वेदिकाला 16 कोटींचं इजेक्शनही देण्यात आलं. पण, दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. आता, तीरा कामतप्रमाणेच पिंपरीतील तन्वी या चिमुकलीलाही दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी याबाबत माहिती दिली.
एका वेळेसचा जनुक बदलण्याचा उपचार असलेल्या झोलजेंस्माची किंमत 16 कोटी रूपये (2.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर) आहे आणि मुलीला वाचवण्यासाठी ते आयात करणे भाग होते. वेदिकाच्या पालकांनी क्राऊड फंडींच्या माध्यमातून 14.3 कोटी जमा केले. तर सरकारी यंत्रणांकडून कर आणि आयात शुल्क माफ करण्यामध्ये पालकांना यश आले. त्यानंतर, वेदिकाला हे इंजेक्शनही देण्यात आले. वेदिकाच्या लढ्यात पाठिशी असलेल्या जगभरातील नागरिकांना याचा आनंद झाला. मात्र, दुर्दैवाने दोन दिवसांपूर्वी वेदिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे वेदिकाच्या मृत्यूनं अनेकांचे डोळे पाणावले. आता, पिपरीतील एका चिमुकलीवरही अशाच महागड्या उपाचाराची गरज आहे. तिच्यासाठीही मदतीची अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
आपली मदत पुढील अकाऊंटवर पाठवता येईल.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 3, 2021
For more information : https://t.co/e4sRBmeILS
Suraj Wavhal (Anvi's Father)
Gpay/PhonePay/Paytm 9766188989
Bank Account Details
Name : Anvi Suraj Wavhal
Account #: 50100440238877
IFSC Code : HDFC0001795
Branch : HDFC Chinchwad
पिंपरीतील आरती वाव्हळ यांची मुलगी अन्वी हिला स्पायनल मस्कुलर अट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला असून त्यावरील उपचारासाठी १६ ते १८ कोटी ₹ एवढा अवाढव्य खर्च अपेक्षित आहे. या आजारावरील औषधं परदेशातून आणावी लागत असल्याने त्यावर टॅक्सही कोट्यवधी रुपयांचा भरावा लागतो. औषधांचा आणि टॅक्सचा हा प्रचंड खर्च कोणत्याही सामान्य माणसाला परवडू शकत नाही. त्यामुळं टॅक्स माफ करण्यात यावा आणि या औषधांबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन सरकारने आणि लोकांनीही उपचारासाठी मदत करावी, अशी विनंत आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पत्र लिहून सर्वोतोपरी मदत करण्याची विनंतीही केली आहे.