पीएमआरडीएच्या निधीतून दोन जम्बो कोविड सेंटरचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:20+5:302021-05-27T04:12:20+5:30

विधायक वापर : बांधकाम शुल्कातील १७०-१८० कोटींचा खर्च पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडी) वतीने बांधकाम व्यावसायिकाकडून ...

Expenditure of two Jumbo Covid Centers from PMRDA funds | पीएमआरडीएच्या निधीतून दोन जम्बो कोविड सेंटरचा खर्च

पीएमआरडीएच्या निधीतून दोन जम्बो कोविड सेंटरचा खर्च

Next

विधायक वापर : बांधकाम शुल्कातील १७०-१८० कोटींचा खर्च

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडी) वतीने बांधकाम व्यावसायिकाकडून बांधकाम शुल्क आकारले जाते. जमा झालेला हा निधी नागरिकांच्या इतर सोयीसुविधेसाठी वापरला जातो. कोरोनाच्या संकटामुळे पुणे (७०० बेड्स) आणि पिंपरी (६०० बेड्स) येथील दोन जम्बो सेंटरची उभारणी तसेच इतर दैनंदिन कामकाज पीएमआरडीए करत आहे. यासाठी वर्षभरात जवळपास १७०-१८० कोटींचा खर्च आम्हाला आल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मागील वर्षी पुणे आणि पिंपरी येथे प्रत्येकी एक जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. याबाबतची घोषणा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली होती. तसेच या दोन्ही सेंटरची जबाबदारी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे देण्यात आली. मात्र याबाबतचा सर्व खर्च राज्य शासन नंतर देणार असून आता हा खर्च संबंधित विभागाने करायचा, असे आदेश दिले. त्यामुळे मागील वर्षभरात या दोन्ही सेंटरच्या उभारणी आणि दैनंदिन देखभालीसाठी पीएमआरडीएने आतापर्यंत १७०-१८० कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे.

---

शंभरहून अधिक रुग्णालयांचे केले फायर ऑडिट

राज्यात अनेक रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना मागील काही महिन्यांत घडल्या होत्या. त्यामुळे राज्य शासनाने सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पीएमआरडीएने पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यातील शंभरहून अधिक रुग्णालयांचे फायर ऑडिट केले आहे. यासाठी साधरण ७३७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्याचा खर्चही पीएमआरडीएनेच केला आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

---

कोट

दोन्ही जम्बो कोविड सेंटरचे काम वर्षभरापासून आपण करत आहोत. यासाठीचा सर्व खर्च पीएमआरडीए करत असून आतापर्यंत १७०-१८० कोटींचा खर्च झाला आहे. हा सर्व निधी आपण हद्दीतील बांधकाम शुल्कापोटी बांधकाम व्यावसायिकाकडून आकारलेल्या निधीतून करत आहे. राज्य शासन आपल्याला तो पूर्ण निधी परत करणार आहे.

- सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए

Web Title: Expenditure of two Jumbo Covid Centers from PMRDA funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.