पदाधिकाऱ्यांच्या खर्चाला कात्री, महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्यांच्या चहापानावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 04:46 AM2019-02-23T04:46:10+5:302019-02-23T04:46:14+5:30

महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्यांच्या चहापानावर संक्रांत : २० टक्के केली कपात

The expenses of the office bearers, the mayor, the leader of the house, the opposition party leaders, the tea party | पदाधिकाऱ्यांच्या खर्चाला कात्री, महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्यांच्या चहापानावर संक्रांत

पदाधिकाऱ्यांच्या खर्चाला कात्री, महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्यांच्या चहापानावर संक्रांत

Next

पुणे : स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी महापालिकेचे सन २०१९-२० चे अंदाजपत्रक सादर करताना महापौर, उपमहापौरांसह सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, सर्व गटनेत्यांच्या चहापान व ऐच्छिक खर्चाला कात्री लावण्यात आली आहे. पदाधिकाºयांच्या एकूण खर्चामध्ये सरासरी २० टक्के कपात करण्यात आली आहे. आयुक्त सौरभ राव यांनी आपल्या अंदाजपत्रकामध्ये मात्र पदाधिकाºयांच्या खर्चामध्ये वाढ केली होती.

मुळीक यांनी शुक्रवारी (दि. २२) महापालिकेचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मुख्य सभेला सादर केले. महापालिकेच्या उत्पन्न व खर्चांचा ताळमेळ न घातल्याने चालू सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकामध्ये तब्बल १५०० ते १७०० कोटींची प्रचंड मोठी तूट निर्माण झाली आहे. असे असताना मुळीक यांनीदेखील आयुक्त सौरभ राव यांनी सादर केलेल्या ६ हजार ८५ कोटींच्या अंदाजपत्रकामध्ये ६८० कोटी वाढ करत ६ हजार ७६५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. पुणेकरांवर कोणत्याही करवाढीचा बोज न टाकता वाढता खर्च भागविण्यासाठी अध्यक्ष मुळीक यांनी थेट सर्व पदाधिकाºयांच्या खर्चात कपात केली आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये पदाधिकाºयांना दरवर्षी वर्षभराच्या खर्चासाठी ठराविक निधी दिला जातो. यामध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता यांच्यासह, विविध पक्षांचे गटनेते यांच्या चहापान खर्चासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.
आयुक्त सौरभ राव यांनीच राजकीय अंदाजपत्रकासारखे उत्पन्नवाढीचे कोणतेही नवीन व ठोस स्रोत न सांगता तब्बल ६ हजार ६५ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. आयुक्तांनी अधिकाºयांसह पदाधिकाºयांच्या खर्चांमध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ केली होती. परंतु मुळीक यांनी पदाधिका-यांच्या सर्वच खर्चामध्ये कपात केली. विविध महोत्सव, संमेलने, प्रशिक्षण वर्ग व कार्यशाळांसाठी उपस्थित राहण्याचा प्रवासखर्च आदी अनेक खर्चामध्ये कपात करण्यात आली आहे.

पदाधिकाºयांसाठी अंदाजपत्रकात निश्चित केलेला निधी
महापौर ऐच्छिक खर्च १ लाख ८४ हजार २ लाख १ लाख ६० हजार
उपमहापौर ऐच्छिक खर्च ५५ हजार ६० हजार ४८ हजार
स्थायी समिती चहापान खर्च ५ लाख ५२ हजार ६ लाख ४ लाख ८० हजार
अध्यक्षांचा ऐच्छिक खर्च ५५ हजार ६० हजार ४८ हजार
विरोधी पक्षनेते चहापान खर्च ५५ हजार ६० हजार ४८ हजार
सभागृह नेते चहापान खर्च ५५ हजार ६० हजार ४८ हजार
शहर सुधारणा समिती चहापान खर्च ३९ हजार ४२ हजार ३३ हजार ६००
विशेष समित्यांचा चहापान खर्च २ लाख ३० हजार २ लाख ५० हजार २ लाख
सभासदांना प्रशिक्षण खर्च ४ लाख ६० हजार ५ लाख ४ लाख
 

Web Title: The expenses of the office bearers, the mayor, the leader of the house, the opposition party leaders, the tea party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे