Pune: मौजमजा करण्यासाठी चोरायचे महागड्या सायकली; सुशिक्षित दांपत्याला अटक

By नितीश गोवंडे | Published: October 30, 2023 05:55 PM2023-10-30T17:55:37+5:302023-10-30T17:56:44+5:30

त्याच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांच्या १४ सायकली जप्त केल्या....

Expensive bikes to steal for fun; Educated couple arrested pune latest crime | Pune: मौजमजा करण्यासाठी चोरायचे महागड्या सायकली; सुशिक्षित दांपत्याला अटक

Pune: मौजमजा करण्यासाठी चोरायचे महागड्या सायकली; सुशिक्षित दांपत्याला अटक

पुणे : सिंहगड रोड पोलिसांनी त्यांच्या हद्दीमधून महागड्या सायकली चोरणाऱ्या सुशिक्षित दांपत्याला सोमवारी अटक केली. त्याच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांच्या १४ सायकली जप्त केल्या. तसेच सायकल चोरीचे तीन गुन्हे देखील उघडकीस आणले. मुख्य बाब म्हणजे हे दांपत्य मौजमजा करण्यासाठी या चोऱ्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. विजय राजेंद्र पाठक (२६, सध्या रा. तळेगाव, मुळ रा. राक्रिश अपार्टमेंट, अंबरनाथ (ईस्ट), ठाणे) आणि डायना डेंझिल डिसोजा (२५, सध्या रा. तळेगाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अभिनव चिल्ड्रन स्कूल समोरील मंदार अपार्टमेंटच्या पार्किंगमधून एक महागडी सायकल चोरीला गेल्याची फिर्याद ६ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. २६ ऑक्टोबर रोजी पोलिस ठाण्यातील तपास पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत होते. तपास पथक वडगाव पुलाजवळ आले असता पोलिस अंमलदार सागर शेडगे व राहुल ओलेकर यांना एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोनजण सायकल घेऊन जाताना दिसले. हे लोक संशयित वाटत असल्याने, पोलिसांनी त्यांना थांबवून सायकल बाबत चौकशी केली. मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

अखेर दोघांनाही पोलिस ठाण्यात आणत पोलिसी खाक्या दाखवताच, विजय पाठक हा डायना डिसोझाच्या मदतीने मौजमजा करण्यासाठी महागड्या सायकल चोरी करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता या सुशिक्षित दांपत्याने नामांकित कंपनीच्या महागड्या सायकल चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम करत आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलिस कर्मचारी आबा उत्तेकर, संजय शिंदे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, अमोल पाटील, देवा चव्हाण, विकास पांडुळे, विकास बांदल, अविनाश कोंडे, दक्ष पाटील, स्वप्नील मगर यांच्या पथकाने केली.

Web Title: Expensive bikes to steal for fun; Educated couple arrested pune latest crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.