महंगा पेट्रोल महंगा तेल, वाह रे मोदी तेरा खेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:19 AM2021-02-06T04:19:10+5:302021-02-06T04:19:10+5:30
----------------- मंचर : महंगा पेट्रोल, मेहंगा तेल, वाह रे मोदी तेरा खेल... केंद्र शासनाच निषेध असो... कमी करा ...
-----------------
मंचर : महंगा पेट्रोल, मेहंगा तेल, वाह रे मोदी तेरा खेल... केंद्र शासनाच निषेध असो... कमी करा कमी करा पेट्रोलचा दर कमी करा.. अशा घोषणांनी आज मंचर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून गेला. आवाज होता तो आंबेगाव तालुका आणि मंचर शहर शिवसेनेच्या वतीने केलेल्या आंदोलनाचा.
महागाईच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने मंचरमध्ये शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यादरम्यान मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर शिवाजी चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्यावेळी अनेकांनी महागाईच्या निषेधार्थ भाषणे केली.
यवेळी शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते देविदास दरेकर म्हणाले की, आगामी काळात दरवाढ कमी न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा आहे. प्रा. राजाराम बाणखेले म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पानंतर राज्यात महागाईचा भडका उडाला असून घरगुती गॅस सिलिंडरचे दर २५ रुपयांनी तर पेट्रोल व डिझेलची एकाच महिन्यात जवळपास अकरा वेळा दरवाढ झाल्याने सर्वाधिक फटका सर्वसामान्य आणि शेतकरीवर्गाला बसला आहे. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख सुरेश भोर, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनी मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकारवर हल्ला चढवला. उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, कल्पेश बाणखेले, सागर काजळे, धनेश मोरडे, योगेश बाणखेले, शिवाजी राजगुरू, शशिकांत बाणखेले, महेश घोडके, संदीप जुन्नरे, सतीश बाणखेले, मालती थोरात, संगीता बाणखेले, सुप्रिया राजगुरव, सविता शिरसागर, किरण राजगुरू, दीपाली थोरात, ज्योती बाणखेले आदी उपस्थित होते.
--
फोटो : ०५ मंचर शिवसेना आंदोलन
फोटो ओळी : महागाईच्या निषेधार्थ आंदोलन करताना शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी.